अर्जावर सही करण्यासाठी महिला सरपंचाने मागितली पाच हजार लाच 

उस्मानाबाद तालुक्यातील 'या' गावच्या महिला सरपंच आणि तिच्या पतीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 
 
अर्जावर सही करण्यासाठी महिला सरपंचाने मागितली पाच हजार लाच
उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई 

उस्मानाबाद - शासनाचे फळबाग योजनेतून लावलेल्या शेवग्याच्या मशागतीकरीता रोजगार मागणी अर्जावर सही  करण्यासाठी पाच हजार लाचेची मागणी करणाऱ्या उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा गावच्या महिला सरपंच आणि त्यांच्या  पतीविरुद्ध बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 
विश्वनाथ गोविंद कांबळे (खाजगी इसम- सरपंच महिलेचा पती ) आणि शशिकला विश्वनाथ कांबळे ( सरपंच - मेंढा  ता.जि.उस्मानाबाद)  अशी आरोपीची नावे आहेत. उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांवर  कारवाई केली. 

तक्रारदार पुरुष ( वय २६ )  यांच्या मेंढा  गावचे  हद्दीत गट क्रमांक 308 मध्ये एक एकर क्षेत्रात शासनाचे फळबाग योजनेतून लावलेल्या शेवग्याच्या मशागतीकरीता रोजगार मागणी अर्जावर महिला सरपंच ( आरोपी क्र.2) यांची सही घेण्यासाठी त्यांचा पती आरोपी क्र.1 यांची दि.10/5/2021 रोजी 09.15 ते 10.22 वा.दरम्यान त्यांच्या घरी भेट घेतली असता त्यांनी पुर्वीच्या पाच मस्टरचे प्रत्येकी 1000/- रुपये प्रमाणे एकुण 5000/- रुपये लाचेची मागणी  पंच साक्षिदारा समक्ष केली व आरोपी क्र.2 यानी आरोपी क्र.1च्या मार्फत लाचेची मागणी करुन लाच रक्कम मागण्यास प्रोत्साहन दिले.

उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे  प्रशांत संपते ( पोलीस उप अधिक्षक ला.प्र.वि.उस्मानाबाद ) यांच्या मार्गदर्शनाखाली  पो.ह.दिनकर उगल मुगले, इफ्तेकार शेख, पो.ना.पांडूरंग डंबरे,पो.का.विष्णू बेळे,अविनाश आचार्य व चालक पो.ना.करडे यांनी सापळा रचला होता. याप्रकरणी बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००) गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद ( मो. क्र. 8888813720) अशोक हुलगे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद (मो. क्र.8652433397) यांनी केले आहे.

From around the web