धाराशिवमध्ये प्रभारी कार्यकारी अभियंत्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल 

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर पाटील अडचणीत 

 
s

धाराशिव – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या प्रभारी कार्यकारी अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर पाटील यांच्यासह त्यांचा मुलगा अभिराम पाटील तसेच स्विय सहाय्यक स्वप्नील पाटील यांच्यावर उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी स्विय सहाय्यक स्वप्नील पाटील यांनी धाराशिव लाइव्हशी बोलताना प्रभारी कार्यकारी अभियंता रवींद्र पवार हे अत्यंत मुजोर अधिकारी आहेत . त्यांना अनेकदा सांगूनही कामात कुचराई करतात. जनतेची कामे घेऊन सुधीर आण्णा सोबत आपण गेलो होतो, तेव्हा त्यांनी वेडेवाकडे बोलून दुरुत्तरे दिली. यावेळी काही लोक चिडले, त्यातील काही लोकांबरोबर त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र आमची नावे माहित असल्यामुळे सुधीर आण्णा, अभिराम आणि माझे नाव घालून मारहाणीची खोटी फिर्याद दिल्याचे म्हटले होते. 

त्यानंतर प्रभारी कार्यकारी अभियंता रवींद्र पवार यांनी मारहाणीचे व्हिडीओ फुटेज देऊन खळबळ उडवून दिली आहे. या फुटेज मध्ये दहा ते बारा लोक एमएसईबी रेस्ट हाऊस सोलापुर रोडवरील पळसवाडी रोड लगत रेस्ट हाऊसचे पाठीमागील बाजुस मेजर स्टोअर घुसून प्रभारी कार्यकारी अभियंता रवींद्र पवार करत करीत  असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर पाटील अडचणीत आले आहेत. 

From around the web