दहा हजार लाच घेताना प्रभारी दुय्यम निबंधाकासह दोघांना पकडले 

लॉकडाऊनच्या काळातही  कळंबमध्ये लाचखोरी सुरूच 
 
दहा हजार लाच घेताना प्रभारी दुय्यम निबंधाकासह दोघांना पकडले

कळंब  - जमीन खरेदी प्रकरणी  दहा हजार लाच रक्कम स्वीकारल्याने प्रभारी दुय्यम निबंधाकासह दोघांना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  ताब्यात घेतले आहे. 

तक्रारदार  हे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या परिसरात  खरेदी विक्रीचे दस्त तयार करण्याचे काम करीत असून तक्रारदार यांनी मोहा येथील पक्षकाराचे जमीन खरेदी खत दस्त बनवून अमृत पांडुरंग बंडगर, प्रभारी दुय्यम निबंधक, कळंब, ज़िल्हा उस्मानाबाद रा. समता नगर उस्मानाबाद यांचेकडे सादर केले असता त्यांनी पक्षकार लिहून देणार हे वयोवृद्ध असून सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याचे कारण सांगून सदर कामासाठी पक्षकाराकडून 10000 रु. घेऊन देण्यासाठी  पंचांसमक्ष सांगून दहा हजर रुपये  लाचेची मागणी दिनांक 08.04.2021 रोजी करून आज दिनांक 16.04.2021 रोजी लाच रक्कम पंचांसमक्ष  स्वीकारून त्यांचा खाजगी ड्राइवर विठ्ठल गोरोबा गहूदळे, वय 38 वर्षे, रा. तांबरी विभाग उस्मानाबाद यांचेकडे दिली सदर कामात  गणेश गोपीनाथ फावडे, वय 40 वर्षे, रा. सावरगाव, ता. कळंब ज़िल्हा उस्मानाबाद यांनी प्रोत्साहन दिले आहे. याबाबत  पो स्टे कळंब , ज़िल्हा उस्मानाबाद येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री.राहुल खाडे , अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद, प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वी उस्मानाबाद यांचे  मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे  , पोलीस निरीक्षक,  ला. प्र. वी.उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार इफतेकार  शेख, विष्णू बेळे, विशाल डोके, चालक दत्तात्रय करडे यांनी मदत केली.

कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००) गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद ( मो. क्र. 8888813720) अशोक हुलगे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद (मो. क्र.8652433397) यांनी केले आहे.

From around the web