धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी येलगट्टे यांना सातव्या गुन्ह्यात अटक 
 

सहाव्या गुन्ह्यात हायकोर्टाकडून जामीन होताच, २७ कोटीच्या घोटाळा प्रकरणी दोन दिवसाची पोलीस कस्टडी 

 
s

धाराशिव -  “लोकशाहीर आण्णाभाऊ  साठे नागरी वस्ती सुधार योजना” सन 2019-20 अन्वये प्राप्त रक्कम 3,14,79,000 ₹ पैकी 21,64,922 एवढी रक्कम योजनाबाह्य खर्च करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी  धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी  हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मंजूर करताच, पोलिसांनी २७ कोटीच्या घोटाळा  प्रकरणी अटक केली . न्यायालयाने याप्रकरणी दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. 

 धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी  हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांच्यावर धाराशिवमध्येएकूण सात गुन्हे दाखल आहेत. सहाव्या गुन्ह्यात धाराशिव न्यायालयाने जामीन नामंजूर केला होता. त्यानंतर येलगट्टे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने मंजूर करताच, पोलिसांनी २७ कोटीच्या घोटाळा  प्रकरणी अटक केली . त्यानंतर न्यायालयात उभे करण्यात आले असता  दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. 

काय आहे प्रकरण ? 

आरोपी नामे- हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद उस्मानाबाद 2) सुरज संपत बोर्डे तत्कालीन लेखापाल, 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक सर्व रा. उस्मानाबाद यांनी दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद उस्मानाबाद येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणिक विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणिवपुर्वक लेखाविभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उसृमानाबाद हा.मु. समर्थ नगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  

लेखापाल सुरज बोर्डे फरार 

धाराशिव नगर पालिकेतील कथित घोटाळा प्रकरणी लेखापाल सुरज संपत बोर्डे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून २०  दिवस झाले तरी आनंदनगर पोलिसांनी बोर्डे यांना अद्याप अटक न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशांत विक्रम पवार ( तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक ) यांना देखील  पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही.  बोर्डे आणि पवार  यांचा सहाव्या आणि सातव्या गुन्ह्यात सहभाग आहे.  बोर्डे आणि पवार  यांना अटक न करण्यासाठी पोलिसाचे खिसे गरम झाल्याची चर्चा सुरु आहे 

From around the web