श्री श्री गुरुकुल शाळेचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के 

दहावी परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार  
 
sd

अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल या शाळेचा माध्यमिक शालांत परीक्षा दहावी वर्गाचा निकाल सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के लागला असून विद्यालयातून एकूण २७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते यात विशेष प्राविण्यासह २३ तर प्रथम श्रेणीत ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व निरोप समारंभ (दि.१९) रोजी आयोजित करण्यात आला होता. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे हे होते तर सचिव तथा उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार,संचालिका डॉ रूपाली कानडे,श्री श्री गुरुकुलचे मुख्याध्यापक शिवराज भुजबळ, रविशंकर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक लक्ष्मण नरे,जेष्ठ शिक्षिका पुष्पा लामतुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कु.सूत्रावे ऐश्वर्या विद्यानंद ९९ टक्के  गुण घेऊन प्रथम,कु.हांडे राजनंदिनी अनिल ९५.टक्के  व्दितीय तर कु.जत्ते प्रांजली नागनाथ ९४.६० टक्के तृतीय क्रमांक व कोकणे समर्थ जयप्रकाश ९४.२०  गुण मिळवत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

ऐश्वर्या सूत्रावे,प्रांजली जत्ते या यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.रघुराम वायकर,विद्यानंद सूत्रावे,सुजाता कोकणे आदी पालकांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवराज भुजबळ यांनी.सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बंडगर यांनी तर आभार संतोष मोकाशे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामेश्वर सावंत, सुरेश गायकवाड, किशोर जाधव,महेश मंगे,अर्जुन सोनटक्के,शांता चव्हाण,मंजुषा जोशी,ज्योती रामपूरे, मयुरी कुलकर्णी, मोहिनी बिराजदार, गायत्री मोरे यांनी परिश्रम घेतले.

From around the web