अणदूरजवळ महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या प्रक्रियेला वेग 

 
s

अणदूर - वीरशैव लिंगायत समाजाची महात्मा बसवेश्वर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची अनेक दिवसा पासूनची मागणी प्रलंबित होती. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी अणदूर-  नळदुर्ग नजीक राष्ट्रीय महामार्गा लगत अणदूर शिवारातील वन विभागाची जागा यासाठी निश्चित केली असून त्यांच्या सूचनेप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बी एम थोरात, कार्यकारी अभियंता श्री चव्हाण, यांच्यासह जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री जोगदंड यांनी जागेची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे. 

सदरील जागा राखीव वन असून वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी अश्वारूढ पुतळा व इतर विकास कामे करण्यासाठी ना हरकत मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेशा पुतळ्यासह ध्यान केंद्र, बाग बगीचा, सुशोभीकरण, लाईट अँड साऊंड शो व  बसवसृष्टी उभारण्याचे प्रस्तावित आहे. 

सदरील ठिकाण तुळजापूर व नळदुर्ग शहरा पासून जवळ व राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने आणखीन एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा मानस आ राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. यासाठी वन विभागाकडील १० एकर जागेची मागणी मागण्यात येत आहे.

From around the web