उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेने कोरोना लसीकरण करण्यावर भर द्यावा - पालकमंत्री गडाख

 
gdakh

उस्मानाबाद  - कोरोना विषाणूंचा धोका टळलेला नसून जिल्ह्यातील नागरिकांनी मध्यंतरीच्या काळात कोरोना लसीकरण करण्यामध्ये शिथिलता आणली आहे. मात्र नवा विषाणू पुन्हा व्हायरल झाल्यामुळे त्याची लागण होत आहे. आजपर्यंत ९ लाख ८९ हजार ७५० नागरिकांनी पहिला तर ४ लाख ३८ हजार २२० नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. पहिल्या डोसच्या प्रमाणात दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण फारच कमी असल्यामुळे सर्वच नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेण्यावर अधिक भर द्यावा. तसेच शेतकऱ्यांनी शेतातील विद्युत पंपाचे बिल भरून शासनाला सहकार्य करावे. कारण विजेपोटी शेतकऱ्याकडे ७० हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा सारासर विचार करूनच वीज मंडळाचे धोरण ठरविले असून महाविकास आघाडी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे आश्वासन पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.


जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री गडाख म्हणाले की, जिल्ह्यातील विकास कामांसाठी २०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षात मंजूर असलेल्या निधीपैकी ९९ टक्के निधी खर्च करण्यात आलेला आहे. 

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायत मध्ये निवडणूका लागल्यामुळे लोकांना काही आमिष दाखविले असा प्रकार होऊ नये म्हणून कोणत्या कामासाठी किती निधी मंजूर करण्यात आला याची माहिती देण्यास निवडणूक आयोगाची परवानगी नसल्यामुळे ती देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. तर‌ मागच्या वेळी कोरोना काळात ज्या ज्या अडचणी आल्या त्या कमी करण्याचा व सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्यासाठी शासन व प्रशासन पूर्णपणे तयारीत आहे. मात्र जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.  ऑक्सिजन प्लांट बाबत बोलताना ते म्हणाले की, डि.जी.  सेटला परवानगी दिली आहे ती कामे लवकरच होतील असे त्यांनी सांगितले. तर ९ लाख ८९ हजार ७५० नागरिकांनी पाहिला तर ४ लाख ३८ हजार २२० नागरिकांनी दुसरा लसीकरणाचा डोज घेतला आहे. 

तहसिलदार गणेश माळी यांच्या गैरवर्तणूक बाबत तक्रारी आल्या असून हे प्रकरण गंभीर अत्यंत गंभीर आहे.‌ त्यामुळे याची चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

From around the web