उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या केवळ ११९ 

आरोग्य आणि पोलीस यंत्रणेवरील ताण हलका 
 
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या केवळ ११९

उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे आरोग्य आणि पोलीस यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. आता प्रतीक्षा लसीची असून, लसीकरणाची जोरदार तयारी सुरु आहे.. 


उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवार दि. १५ डिसेंबर रोजी नव्या २४ रुग्णाची नोंद झाली तर ३८  जण बरे होवून घरी परतले. जिल्हयात सध्या फक्त ११९ ऍक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने कमी होत आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ७१  रुग्ण आढळून आले असून, पैकी १५ हजार ३९५ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ११९  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोनाने ५५७ जणांचा बळी घेतला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या कमी झाली असली तरी अजूनही अनेक नियम घालून देण्यात आले आहेत. हे नियम ३१ डिसेंबर पर्यंत लागू आहेत.तसेच जिल्ह्यातील यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. 

From around the web