उस्मानाबाद शहरातील 'या' मुद्रांक विक्रेत्याचा परवाना रद्द होणार
मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली कारणे दाखवा नोटीस
Updated: Sep 13, 2021, 15:39 IST
उस्मानाबाद लाइव्हचा दणका
उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरात गेल्या काही दिवसापासून मुद्रांक तथा स्टॅम्प पेपरचा काळाबाजार सुरू होता, कृत्रिम टंचाई निर्माण करून अव्वाच्या सव्वा दराने स्टॅम्प पेपर्स विकले जात होते. पाचशे रुपयांचा स्टॅम्प साडे पाचशे रुपयाला विकला जात होता, त्याचे स्टिंग ऑपरेशन आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी काही दिवसापूर्वी केले होते तर उस्मानाबाद लाइव्हने हे वृत्त व्हिडिओसह प्रकाशित केले होते.
या बातमीनंतर मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी १ सप्टेंबर कोर्टाशेजारील मुद्रांक विक्रेता सुहास श्रीराम देशमुख याच्या दुकानास भेट दिली असता, अनेक त्रुटी दिसून आल्या. यावरून देशमुख यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, आपला मुद्रांक विक्रीचा परवाना रद्द का करू नये ? अशी विचारणा करण्यात आली आहे.
हीच ती कारणे दाखवा नोटीस
हेच ते स्टिंग ऑपरेशन