कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस २४ रोजी मिळणार  

 
as

उस्मानाबाद - ४५ वर्षाच्या वरील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस २४ मे रोजी जिल्ह्यातील ४३ निवडक आरोग्य उपकेंद्रमधून दिला जाणार आहे. तर २ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ६ ग्रामीण रुग्णालय, ४ उपजिल्हा रुग्णालय, शासकीय जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व पोलीस रुग्णालय उस्मानाबाद या ठिकाणी हे डोस दिले जाणार आहेत.

लसीकरणासाठी जाताना नागरिकांनी आपले आधार कार्ड सोबत बाळगणे आवश्यक असून या दिवशी केवळ ४५ वर्ष वयाच्यापुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तसेच ज्या नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच नागरिकांना दुसरा डोस दिला जाणार असल्याने इतरांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये.

लसीकरण देणारी केंद्रे तालुकानिहाय पुढील प्रमाणे - उस्मानाबाद - गोवर्धनवाडी, किनी, रुई ढोकी, गौडगाव, बोरखेडा, कौडगाव, सोनेगाव, जवळे दुमाला व कुमाळवाडी तर उमरगा तालुक्यातील हिप्परगा रवा, कवठा, पेठ सांगवी, त्रिकोळी, चिंचोली भुयार, कलदेव निंबाळा व कोराळ तसेच तुळजापूर तालुक्यातील केशेगाव (अणदूर) उमरगा चिवरी, बोरी, चिंचोली, कुंभारी, गवळेवाडी व जळकोटवाडी तर लोहारा तालुक्यातील पांढरी विलासपूर, लोहारा खुर्द, साळेगाव व उदयपुर तर कळंब तालुक्यातील चोराखळी, जवळा खुर्द, करंजकल्ला, हासेगाव, घारगाव, कोथळा व वाठवडा तसेच वाशी तालुक्यातील लाखनगाव, सारोळा मां, कन्हेरी, पिंपळगाव क, व शेंडी तर भूम तालुक्यातील हाडोंग्री व परंडा तालुक्यातील कंडारी, पाचपिपळा व तांदुळवाडी याबरोबरच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वैराग रोड, उस्मानाबाद, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, रामनगर, उस्मानाबाद,  पोलिस रुग्णालय उस्मानाबाद (केवळ फ्रन्टलाइन वर्करसाठी), ग्रामीण रुग्णालय मुरूम ग्रामीण रुग्णालय लोहारा ग्रामीण रुग्णालय सास्तूर ग्रामीण रुग्णालय तेर ग्रामीण रुग्णालय वाशी ग्रामीण रुग्णालय भूम उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय कळम उपजिल्हा रुग्णालय परंडा चिंचोली हॉस्पिटल, उमरगा (उपजिल्हा रुग्णालयात अंतर्गत मोफत) शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद या केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. 

 या केंद्रावर सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अथवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही. मात्र लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्यांपैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना ऑन स्पॉट नोंदणी पद्धतीने लसीकरण केले जाणार आहे. तसेच लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार असून यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. तर ज्या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा असे ‌दोन्ही डोस दिले जाणार आहेत. अशा ठिकाणी दोन्ही लसींच्या लाभार्थ्यासाठी स्वतंत्र नोंदणी व रांगा ठेवण्यात येणार आहेत. तर लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलिस प्रशासनाने गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये मदत करावी. त्यामुळे उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवीत लस द्यावी असे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.

From around the web