उस्मानाबाद जिल्ह्यात कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस २५ मे रोजी मिळणार  

 
sd

उस्मानाबाद - जिल्ह्यातील ४५ वर्षाच्या वरील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस २५ मे रोजी जिल्ह्यातील ४४ प्राथमिक आरोग्य केंद्र, तर २ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ६ ग्रामीण रुग्णालय, ४ उपजिल्हा रुग्णालय, शासकीय जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व पोलिस रुग्णालय उस्मानाबाद या लसीकरण केंद्रावर ११ हजार १०९ जणांना लस दिली जाणार आहे. 

लसीकरणासाठी जाताना नागरिकांनी आपले आधार कार्ड सोबत बाळगणे आवश्यक असून या दिवशी केवळ ४५ वर्ष वयाच्यापुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तर ज्या नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच नागरिकांना दुसरा डोस दिला जाणार असल्याने इतरांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये.

लसीकरण ग्रामीण भागासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येणार असून यामध्ये तालुकानिहाय लसीकरण केंद्राची नावे पुढील प्रमाणे  - उस्मानाबाद - येडशी, ढोकी, कोंड, जागजी, पाडोळी (आ), पाटोदा, केशेगाव, पोहनेर, बेंबळी व समुद्रवाणी तर तुळजापूर तालुक्यातील अणदुर, जळकोट, नळदुर्ग, सावरगाव, काटगाव, सलगरा (दि) व मंगरूळ (तु), तसेच उमरगा तालुक्यातील मुळज, नाईचाकूर, येणेगुर, आलूर व डिग्गी तर लोहारा तालुक्यातील कानेगाव, माकणी, जेवळी व आष्टा कासार व कळंब तालुक्यातील शिराढोण, येरमाळा, मोहा, दहिफळ, ईटकुर व मंगरूळ (क) तर वाशी तालुक्यातील पारा, पारगाव व तेरखेडा व भूम तालुक्यातील पाथरूड, माणकेश्वर, वालवड व अंबी तसेच परंडा तालुक्यातील आसू, आनाळा, जवळा (नि) व शेळगाव या ग्रामीण भागातील ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रावर ८ हजार ८०० लस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 तर शहरातील नागरिकांसाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वैराग रोड, उस्मानाबाद, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, रामनगर, उस्मानाबाद,  पोलिस रुग्णालय उस्मानाबाद (केवळ फ्रन्टलाइन वर्करसाठी), ग्रामीण रुग्णालय मुरूम, ग्रामीण रुग्णालय लोहारा, ग्रामीण रुग्णालय सास्तूर, ग्रामीण रुग्णालय तेर, ग्रामीण रुग्णालय वाशी, ग्रामीण रुग्णालय भूम, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उपजिल्हा रुग्णालय कळंब, उपजिल्हा रुग्णालय परंडा, चिंचोली हॉस्पिटल, उमरगा (उपजिल्हा रुग्णालयात अंतर्गत मोफत) शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद या केंद्रावर २ हजार ३०० लसीकरण करण्यात येणार आहे. या ५९ केंद्रावर सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अथवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही. मात्र लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्यांपैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना ऑन स्पॉट नोंदणी पद्धतीने लसीकरण केले जाणार आहे. 

तसेच लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार असून यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. तर ज्या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा असे ‌दोन्ही डोस दिले जाणार आहेत. अशा ठिकाणी दोन्ही लसींच्या लाभार्थ्यासाठी स्वतंत्र नोंदणी व रांगा ठेवण्यात येणार आहेत. तर लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलिस प्रशासनाने गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये मदत करावी. त्यामुळे उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवीत लस द्यावी, असे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.

From around the web