धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा वनवास अखेर संपला  !

 

 
d

धाराशिव - धाराशिवमध्ये मागील वर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले. सध्या हे महाविद्यालय जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बिल्डिंगमध्ये सुरु आहे.  वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतंत्र बिल्डिंग बांधण्यासाठी शोधाशोध सुरु होती. अखेर जागेचा वनवास अखेर संपला  आहे. 


तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्या उपस्थितीत २०१९ साली धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागीच शोधाशोध करण्यासाठी पहिली पाहणी करण्यात आली होती.मात्र त्यात राजकीय नाट्यांतर व सत्ता संघर्षाचा बराच प्रयोग रंगला गेला. त्यामुळे विविध ठिकाणी जागा पाहण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. मात्र पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत दि.१५ ऑगस्ट रोजी गट नंबर ३९२ व ३९७ मधील जवळपास ४० एकर जमीन या महाविद्यालयासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ही पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ शिल्पा डोमकुंडवार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती धनंजय सावंत, आदींसह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

From around the web