महावसुलीत रमलेल्या आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले...

- वासुदेवराव काळे
 
d

उस्मानाबाद  - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देणे तर सोडाच उलट महावसुली करण्यात रमलेल्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे अशी घणाघाती टिका भारतीय जनता किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेवराव काळे येथे केली.  शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शेतकरी संवाद अभियान राबविण्यात येत आहे त्याची सुरुवात त्यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानीचे पुजन करून केली.

यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कार्यकाळात घेतलेले निर्णयांची माहिती दिली. यामध्ये पंतप्रधान स्वाईल हेल्थ कार्ड, MSP ची पुनर्रचना, पंतप्रधान किसान सन्मान अर्थसहाय्य योजना, APMC सुधारणा केल्या, करार शेती कायदा असे अमुलाग्र बदल केले, हे करताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडुन शेतकऱ्यांना भ्रमित करण्यासाठी मोठा प्रयत्न केला गेला असा आरोप ही त्यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा किसान मोर्चा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोरडे, सुधाकर भोयर व रंगनाथ सोळंकी यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नेताजी पाटील, प्रदेश कार्यकारी सदस्य व्यंकटराव गुंड, खंडेराव चौरे, सरचिटणीस नितीन भोसले, रामदास कोळगे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, ओबीसी मोर्चाचे विजय शिंगाडे, तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, राजाभाऊ पाटील, राजेंद्र पाटील, राजकुमार पाटील, नानासाहेब कदम, साहेबराव घुगे, मकरंद पाटील, शिवाजीराव गिड्डे, अभय इंगळे, पूजा देडे,  इकबाल मुल्ला, बालाजी सोनटक्के, गजानन वडने, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

From around the web