तेरसह चार गावाचा पाणीपुरवठा सुरु

 
 तेरसह चार गावाचा पाणीपुरवठा सुरु


उस्मानाबाद- तालुक्यातील तेर, ढोकी, कसबे तडवळे व येडशी चार गाव पाणीपुरवठा ग्रामपंचायतकडील असलेल्या थकबाकीमुळे ३ ऑगस्टपासून बंद करण्यात आला होता.
याबाबत माहिती मिळताच भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी, कार्यकारी अभियंता (मजिप्रा) यांना सद्य परिस्थिती अवगत करून या गावांचा पाणी पुरवठा पुनश्च सुरु करण्याबाबततसेच फोनवरून बातचीत केली होती तसेच पत्र दिले होते. या पत्राची दखल घेऊन आजपासून पाणीपुरवठा पुन्हा सुरु करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

From around the web