पळसपमध्ये कब्रस्तानमध्ये प्रेताचे दफन करण्यास तहसिलदारांची मनाई

मुस्लिम बांधवांची जिल्हाधिकाऱ्याकडे धाव, मुख्यमंत्र्याना निवेदन 
 
de

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील पळसप कब्रस्तानसंबंधी उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांची भूमिका पूर्वग्रह दूषितपणाची आहे. त्यांच्याकडून अल्पसंख्य मुस्लिमांना न्याय मिळण्याची आशा नसल्याची भावना मुस्लिम समाजाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शासनाच्या अन्य प्रतिनिधींना कळविली असून तहसीलदार गणेश माळी यांनी शव दफन करण्यास केलेली मनाई उठविण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील मौजे पळसप येथे मुस्लीम समाजासाठी दफन विधी करण्यासाठी अत्यंत जुने असे वक्फ बोर्डाचे मालकीचे कब्रस्तान आहे. त्या कब्रस्तानमध्ये शांततेने दफन विधी होत आला आहे. या कब्रस्तानमध्ये काही दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने पत्र्याचे शेड मारून व्यवसाय गाळे सुरू केले. ते गाळे हे कब्रस्तानच्या हद्दीत येत असल्यामुळे याबाबत आम्ही रितसर तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांनी, निर्देश केल्याप्रमाणे उस्मानाबादचे तहसिलदार गणेश माळी यांनी पळसप गांवी येऊन एका गटाशी चर्चा करून ग्रामपंचायतीने बनवलेले गाळे थांबवण्याऐवजी पुढील आदेशापर्यंत थेट कब्रस्तानमध्ये दफन करण्यास तोंडी मनाई केली, त्यावेळी त्यांनी कब्रस्तानसंदर्भात वक्फ बोर्डाचे कागदपत्रे बघण्यास नकार दिला.

तीन दिवसापूर्वी समाजातील ८५ वर्षीय अल्लाबक्ष यासीन शेख यांचं निधन झाले. त्यांचं शव कब्रस्तानमध्ये दफन करण्यास मनाई असल्यामुळे प्रेत दफन कोठे करायचे, असा मोठा प्रश्न पळसपच्या मुस्लीम समाजासमोर होता. समाजातील काही लोकांनी तहसिलदार माळी यांना फोन करून प्रेत कोठे दफन करायचे, अशी विचारणा केली. त्यावर तहसिलदार  यांनी त्या कब्रस्तानमध्ये प्रेत दफन करावयाचे नाही, असे पुन्हा बजावले. त्यावेळी समाजात असंतोष पसरून तणाव निर्माण झाला.

ते शव समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाण्याचे निश्चित केले. तेव्हा तहसिलदार माळी यांनी गावात मोठा पोलीस बंदोबस्त लाऊन त्या ठिकाणी पोलीस उपअधिक्षक मोतीचंद राठोड व दंडाधिकारी योगेश खरमाटे आणि तहसिलदार माळी स्वतः गावात आले. तणावाच्या परिस्थितीत चर्चा होऊन मुस्लीम समाजातील उस्मानाबाद येथील आलेल्या दोन प्रतिष्ठीत व्यक्तींनी ( मसूद शेख आणि कादर खान ) समाजाची बैठक घेऊन मुस्लीम समाजाला समजावलेनंतर प्रेत वादग्रस्त जागी न दफन करता दुसऱ्या बाजुला कब्रस्तानमध्ये दफन करावयाचे ठरवले, परंतु त्यासही सुध्दा तहसिलदारांनी आडकाठी आणून तेथे सुध्दा दफन करावयाचे नाही, असे सुनावले. त्यामुळे मोठा तणाव निर्माण होऊन परिस्थिती अत्यंत गंभीर बनली.

यावेळी उपविभागीय दंडाधिकारी योगेश खरमाटे व पोलीस अधिक्षक राठोड यांनी योग्य न्यायाची भुमिका घेऊन प्रेत दुसऱ्या बाजुच्या कब्रस्तानमध्ये दफन करण्याची परवानगी दिली व दफन विधी सुरळीत पार पडला, त्यावेळी पुढे निर्माण होणारा मोठा अनर्थ टाळला.

याप्रकरणी तहसीलदार गणेश माळी यांची भूमिका राजकीय भावनेने प्रेरित असून ते एखाद्या पक्षाचे राजकीय हस्तक म्हणून काम करीत असल्याची भावना पळसप गावातील अल्पसंख्य मुस्लिम समाजाची बनली आहे. याप्रश्नी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे महसूल मंत्री अल्पसंख्याक मंत्री आणि उस्मानाबादचे पालक मंत्री यांना निवेदन पाठवून न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

तालुक्यातील पळसप येथे मुस्लिम समाजाची मोठी संख्या असून या समाजासाठी प्रेताची दफनविधी करण्यासाठी वक्फ बोर्डाच्या मालकीचे अत्यंत जुने कब्रस्तान आहे. मात्र या कब्रस्तान च्या जागेवर ग्रामपंचायतीने व्यापारी गाळे उभारले असून यासंदर्भात तक्रार केली असता तहसिलदारांनी पाहणी करून याठिकाणी प्रेताचा दफन विधी करायचा नाही असे तोंडी आदेश दिले आहेत. त्यामुळे दफन विधी करायचा कुठे ? अशी मागणी मुस्लिम समाज बांधवांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथील मुस्लीम समाजाच्या कबरस्तानमध्ये ग्रामपंचायतने पत्र्याचे शेड मारून व्यवसाय गाळे सुरू केले आहेत. सदरील गाळे हे कब्रस्तानच्या हद्दीत येत असल्यामुळे याबाबत मुस्लिम समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी उस्मानाबाद तहसिलदारांना निर्देश केल्याप्रमाणे तहसीलदार गणेश माळी यांनी पळसप या गावात येऊन एका गटाशी चर्चा करून ग्रामपंचायतने उभारलेल्या गाळ्यांचे काम थांबविण्या ऐवजी पुढील आदेशापर्यंत थेट कब्रस्तानमध्ये दफन करण्यास तोंडी मनाई केली. तर कब्रस्तान संदर्भात वक्फ बोर्डाचे कागदपत्र माळी यांनी बघण्यास नकार दिला. परंतू मागील तीन दिवसापूर्वी मुस्लिम समाजातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे कब्रस्तानमध्ये दफन करण्यास मनाई असल्यामुळे प्रेताचे दफन कोठे करायचे ? असा मोठा प्रश्न मुस्लिम समाजातील लोकांसमोर निर्माण झाला होता. त्यामुळे काहीजणांनी तहसिलदारांना फोन करून प्रेत कोठे दफन करायचे आहे ? अशी विचारणा केली असता तहसिलदारांनी त्या कब्रस्तानमध्ये प्रेत दफन करायचे नाही असे बजावले. त्यामुळे समाजामध्ये मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

समाजाच्यावतीने प्रेत जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाण्याचे ठरले. त्यामुळे तहसिलदारांनी गावात मोठा पोलिस बंदोबस्त लावून त्या ठिकाणी पोलिस उपविभागीय अधिकारी मोतीचंद राठोड व दंडाधिकारी योगेश खरमाटे, तहसिलदार गणेश माळी स्वतः गावात आले. या तणावाच्या परिस्थितीत चर्चा करुन मुस्लिम समाजातील उस्मानाबाद येथील आलेल्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी समाजाची बैठक घेऊन मुस्लिम समाजाला समजावल्यानंतर प्रेत वादग्रस्त जागी दफन न करता दुसऱ्या बाजूला कब्रस्तानमध्ये दफन करण्याचे ठरवले. परंतू त्यामध्ये सुद्धा तहसिलदारांनी आडकाठी आणून तेथे सुद्धा दफन करायचे नाही असे सुनावले. त्यामुळे मोठा तणाव निर्माण होऊन परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी खरमाटे व उपविभागीय पोलिस अधिकारी राठोड यांनी योग्य न्यायाची भूमिका घेऊन प्रेत दुसऱ्या बाजूच्या कब्रस्तानमध्ये दफन करण्याची परवानगी दिल्यामुळे दफनविधी सुरळीत पार पडल्याने निर्माण होणारा मोठा अनर्थ टळला. तहसिलदार हे गावातील काही राजकीय लोकांच्या दबावाखाली असून त्यांचा कबरस्तानकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्व दूषित असल्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा नाही. त्यामुळे माळी यांच्याकडील चौकशी काढून घेऊन निपक्ष अशा अधिकाऱ्याकडे हे प्रकरण देऊन आम्हाला न्याय द्यावा व कब्रस्तानमध्ये दफन करण्यासाठी केलेली मनाई उठविण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कादर खान, बबलू शेख, खलील सय्यद, जावेद काझी, खलिफा कुरेशी, मसुद काझी, असलम पटेल, अब्बु पटेल, जमीर पटेल, बाबा मुजावर, इस्माईल काजी, जावेद पठाण, मेहराज शेख, खलील पठाण, खालेद पटेल, अफसर पटेल, हुसेन पटेल, कमान पटेल, जाफर पठाण, एजाज पठाण व गयासोद्दीन शेख आदींच्या सह्या आहेत.

From around the web