पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची मुंबईला बदली
उस्मानाबाद - उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची मुंबईला पोलीस उपायुक्त ( डीसीपी ) म्हणून बदली झाली असून, पुण्याच्या श्रीमती नीवा जैन उस्मानाबाद पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेणार आहेत.
राज तिलक रौशन यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतला होता. गेल्या दोन वर्षात त्यांनी बऱ्यापैकी कामगिरी वाजवली. तसेच कोरोना काळात त्यांनी चांगले काम केले.
उस्मानाबाद तालुक्यात २०१५ मध्ये वाघोली येथे एक अनोळखी माहिलेचे शव आढळले . यात ओळख पटवणे अतिशय अवघड असताना राजतिलक रौशन यांनी तिच्या अंगातील कुर्ताच्या लेबल टॅगवरूनऑनलाईन फ्लिपकार्ट कंपनीकडून, असे कुर्ता खरेदी करणाऱ्या ग्राहकांची यादी व मोबाईल नंबर घेऊन त्या सर्व मोबाईलचे लोकेशन तपासले असता, एका मोबाईलचे वाघोली लोकेशन आढळले. एवढ्या तुटपुंज्या माहितीवरूनच मयत व आरोपीची ओळख पटवून तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असता तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास कामाबद्दल पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी एसपी राजतिलक रौशन यांना सर्वोत्कृष्ट ‘अपराधसिध्दी’ प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले होते.
नव्या पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यापूर्वी पुणे येथे राज्य राखीव पोलीस बलमध्ये समावेशक म्हणून कार्यरत होत्या.
उस्मानाबादचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांची पोलीस अधीक्षक, दहशवादी विरोधी पथक, औरंगाबाद येथे बदली झाली आहे.
डीवायएसपी मोतीचंद राठोड यांची ठाण्याला बदली
उस्मानाबादचे डीवायएसपी तथा उपविभागीय अधिकारी मोतीचंद राठोड यांची सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून ठाणे शहर येथे बदली झाली आहे तर भूमचे उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांची अप्पर पोलीस अधीक्षक , लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद येथे बदली झाली आहे.
उस्मानाबादचे नवे पोलीस कारभारी
- श्रीमती नीवा जैन - पोलीस अधीक्षक
- नवनीत कुमार काँवत - अपर पोलीस अधीक्षक
- रमेश बरकते - उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरगा
- सई प्रताप भोरे पाटील उर्फ शीतल पाटील - उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर
आयपीएस अधिकाऱ्यांनी नाव आणि बदलीचं ठिकाण
- श्रीमती नीवा जैन (पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद)
- श्री. एस. व्ही. पाठक (पोलीस उप आयुक्त,मुंबई शहर)
- श्रीमती एन. अंबिका (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षक केंद्र, मरोळ)
- श्री शशीकुमार मिना (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे)
- श्री प्रविण सी. पाटील (पोलीस अधीक्षक, धुळे)
- श्री. वसंत के. परदेशी (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-७, दौंड)
- श्रीमती विनीता साहु (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-५, दौंड)
- श्री शहाजी उमाप (पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण)
- श्री एस. जी. दिवाण (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट १६, कोल्हापूर)
- श्री पंकज अशोकराव देशमुख (पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे, पुणे)
- श्रीमती मोक्षदा अनिल पाटील ( पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, औरंगाबाद)
- श्री राकेश ओला ( पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन, नागपूर)
- डॉ. हरी बालाजी एन. (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
- महेंद्र पंडित कमलाकर (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
- निलोत्पल (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
- मनिष कलवानिया (उपायुक्त, नागपूर शहर)
- डॉ. सुधाकर बी पाठारे (उपायुक्त, ठाणे शहर)
- अविनाश एम. बारगल (पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण)
- नंदकुमार टी. ठाकूर (पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नांदेड)
- नितीन पवार (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
- दिगंबर पी प्रधान (दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण)
- तुषार सी. दोषी (पोलीस अधीक्षक, एटीएस, पुणे)
- श्रीकांत एम. परोपकारी (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र,नागपूर)
- सचिन पाटील (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)
- चिन्मय पंडीत (उपायुक्त, नागपूर शहर)
- विजय मगर (पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण)
- निमीत गोयल (पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण)
- पी. आर. पाटील (पोलीस अधीक्षक, नंदुरबार)
- बच्चन सिंह ( पोलीस अधीक्षक, वाशिम)
- राज तिलक रोशन (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
- पवन बनसोड (अप्पर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण)
राज्य गृह विभागाने पोलीस सेवेतील ६ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने पदस्थापना केल्या आहेत.
- अनुराग जैन (सहाय्यक पोलीस अधीक्षक ते अप्पर पोलीस अधीक्षक, लातूर)
- बगाटे नितीन दत्तात्रय (सहाय्यक पोलीस अधीक्षक ते अप्पर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग)
- गौरव सुरेश भामरे (सहाय्यक पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ते अप्पर अधीक्षक, वाशिम)
- नवनित कुमार काँवत (सहाय्यक पोलीस अधीक्षक , पुणे ते अप्पर अधीक्षक, उस्मानाबाद)
- श्रवण दत्त एस. (सहाय्यक पोलीस अधीक्षक, परभणी ते अप्पर अधीक्षक, बुलढाणा)
- अनुज मिलींद तारे (सहाय्यक पोलीस अधीक्षक, चंद्रपूर ते अप्पर अधीक्षक, अहेरी, गडचिरोली)