चोराखळीच्या सुनील नवले यांचा कोरोनामुळे पुण्यात मृत्यू 

एकाच महिन्यात कुटुंबातील चौघांचा मृत्यू
 
चोराखळीच्या सुनील नवले यांचा कोरोनामुळे पुण्यात मृत्यू

उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील चोराखळी येथील रहिवाशी तथा हनीवेल लिमिटेड, पुणेचे बिझनेस हेड  सुनील माणिकराव नवले (वय ५१ ) यांचे 9  मे २०२१ रोजी सकाळी १०.30  वाजता रूबी हॉल हॉस्पिटल पुणे येथे निधन झाले. 

बीपी आणि कोविड पॉझिटिव्हमुळे २१ एप्रिल २०२१ रोजी रुबी हॉलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते  ते स्व. माणिकराव नवले, चोरखळी यांचे दुसरे पुत्र आणि तुळजापूर येथील विष्णुपंत पैलवान यांचे जावई आणि डॉ.अरविंद नवले व कै.प्राध्यापक संजय नवले यांचे बंधू होते. त्यांच्या पश्चात  पत्नी-मधु, दोन मुली  , मुलगा , एक भाऊ आणि एक बहीण आणि चुलते मेहुणे, पुतणे असा परिवार आहे. सुनिल नवले यांच्या  निधनामुळे उस्मानाबाद तुळजापुर कळंब व हनीवेल कंपनी परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

अनेकांच्या मदतीला धाऊन जाणारे व सामाजिक कार्यात सक्रीय योगदान देणारे सुनील नवले यांच्या निधना मुळे हळहळ व्यक्त केली जात आहे . त्याच्या पार्थिवावर पुणे शहरात अंत्यसंस्कार करण्यात आले. 


 एकाच महिन्यात कुटुंबातील चौघांचा मृत्यू

डॉ.संजय नवले यांचे निधन


कोरोनामुळे नवले कुटुंबातील  चौघांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांमध्ये हिंदीचे प्राध्यापक असलेले संजय नवले कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान 15 एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. ते साहित्यिकही होते. याची बातमी पुण्यात असलेल्या त्यांच्या आई-वडिलांना कळाली. उस्मानाबादेत अंत्यविधोला उपस्थित राहिले. मात्र, तेथेच त्यांची प्रकृती बिघडली.


पुत्र वियोगाचा धक्का सहन न झाल्याने त्यांना उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं उपचार सुरू असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात आलं आणि आई-वडिलांचाही 23 एप्रिलला कोरोनामुळे मृत्यू झाला. वडील माणिकराव नवले हे माजी शिक्षण शिक्षण आधिकारी होते. त्यांची पत्नी मंदाकिनी नवले (वय 78) यांचाही मृत्यू झाला. दोघांचा मृत्यू मधलं अंतर होतं दोन तास. त्यानंतर पुण्यात उद्योजक असलेले सुनील नवले (वय 51) यांचही कोरोनामुळे उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. मुळचे चोराखळी, ता. कळंब येथील रहिवाशी होते. शुन्यातून विश्व उभा करणाऱ्या चौघांचा 25 दिवसांच्या आत मृत्यू झाल्याने नातेवाईकांसह ग्रामस्थांनाही धक्का बसला आहे.

चोराखळी (ता.कळंब) येथील नवले कुटुंबावर नियतीने क्रूर घाला घातला आहे. कोरोनाने एकाच कुटुंबातील चौघांचा (आई-वडिल व दोन मुले) मृत्यू महिन्याच्या आत झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे चोराखळी गावावर शोककळा पसरली असून गावकरी भीतीच्या सावटाखाली आहेत.

From around the web