तुळजापूरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील  उप अधीक्षकाची आत्महत्या 

कर्मचाऱ्यानी त्रास दिल्याने राहत्या घरी गळफास घेतला 
 
तुळजापूरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील  उप अधीक्षकाची आत्महत्या

तुळजापूर: तुळजापूरच्या भूमी अभिलेख  कार्यालयातील कार्यलय प्रमुख उप अधीक्षकाने  कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 


भूमी  अभिलेख कार्यालय, तुळजापूर येथील कर्मचारी  एस.एन. सुर्यवंशी, एस.एस. ढोले ए.ए. माने यांनी खोट्या सह्यांची बनावट कागदपत्रे, फेरफार इत्यादी कार्यालयीन कागदपत्र बनवली होती. यावरुन कार्यालय प्रमुख तथा उप अधीक्षक -   पंडीत डोईफोडे, वय 52 वर्षे यांनी नमूद तिघाविरुद्ध  पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवल्याने नमूद लोक पंडीत डोईफोडे यांना वेळोवेळी मानसिक त्रास देत होते.

 त्यांच्या या त्रासास कंटाळून पंडीत डोईफोडे यांनी दि. 04.01.2021 रोजी तुळजापूर येथील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या भाऊ- मारुती डोईफोडे यांनी आज दि. 05.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 306, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

.

From around the web