केकस्थळवाडी येथील बालविवाह थांबविण्यात प्रशासनास यश

उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील केकस्थळवाडी येथे होणारा नियोजित बालिकेचा बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले. या संदर्भात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, यांच्या आदेशानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.एच.निपाणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व विकास प्रकल्प् अधिकारी अनिल कांबळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी जे.जी. राठोड, बाल संरक्षण अधिकारी ए.बी.कोवे यांच्या सुचनेनुसार दि. 21 फेब्रुवारी 2021 रोजी छुप्या पदधतीने बालविवाह उरकण्याचा प्रयत्न केला जात असतांना ग्राम बाल संरक्षण आणि वार्ड बाल संरक्षण समितीच्या प्रयत्नाने हा नियोजित बाल विवाह रोखण्यात यश मिळाले आहे.
हा बालविवाह रोखण्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे, बाल विकास प्रकल्प् अधिकारी जे.जी.राठोड, आरोग्य अधिकारी आर.ए.बनसोडे, बाल संरक्षण अधिकारी श्रीमती.विभावरी खुने व समुपदेशक कोमल कुलकर्णी, पर्यवेक्षिका यांच्या प्रयत्नाने नियोजित बाल विवाह दोन्ही वधु व वर यांना समुपदेशन करुन तसेच त्यांच्याकडून जबाब घेवून हमीपत्र घेवून थांबविण्यात आला.
या कामी ग्रामसेवक पी.एस.हिगे(भंडारवाडी), बीट अंमलदार एस.आर.गिरी तेर पोलिस स्टेशन ढोकीचे पोलिस कॉन्स्टेबल श्री.तरटे, पोलीस पाटील चंद्रकांत बनसोडे (भंडारवाडी),अंगणवाडी कार्यकर्ती के.व्ही.भंडारे, दयानंद माळी,राहूल माळी, हनुमंत गुरव, नितीन काकडे,पाटील बळीराम, भंडारवाडीचे नागरिक यांच्या विशेष प्रयत्नाने आणि ग्राम बाल संरक्षण समितीच्या सतर्कतेमुळे संबंधित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला समुपदेशन करुन पंचनामा करुन ही बालविवाह थांबवण्यात आला.
मुलीला व तिच्या माता पित्यांनी बाल कल्याण समिती उस्मानाबाद यांच्याकडे पाठविण्यात आले. समिती सदस्य् नंदकिशोर कोळगे ,कस्तुरबा कारभारी व कैलास मोटे यांनी मुलीच्या परिस्थतीचा व तिच्या मानसिकतेचा विचार करुन मुलीला काळजी व संरक्षणाची आवश्यकता आहे, का याचा अभ्यास केला. बालविवाह करणार नाही व केल्यास बाल न्याय अधिनियमा अंतर्गत असलेल्या शिक्षीस पात्र राहीण, असे बंद पत्र ही संबंधिता मुलींकडून लिहून घेण्यात आले.
व्हेलेंटाइन डे दिवशी होणारे दोन बालविवाह थांबविण्यात जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश
उस्मानाबाद शहरातील दि.14 फेब्रुवारी-2021 रोजी व लोहारा तालुक्यातील मार्डी येथील दि.15 फेब्रुवारी-2021 रोजी होणार दोन अल्पवयीन बालिकांचे बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड व पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्या आदेशानुसार बी. एच. निपाणीकर, ए. बी. कोवे व पोलीस निरिक्षक बुधवंत तसेच पोलीस उपनिरीक्षक ए.एन. वाढोरे (लोहारा) व विस्तार अधिकारी ढाकणे यांच्या सूचनेनुसार बी. एच. निपाणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण् अधिकारी ए.बी. कोवे व विस्तार अधिकारी लोहारा ढाकणे व पोलीस अधिकारी बुधवंत यांच्या सुचनेनुसार उस्मानाबाद शहरातील आई लॉन्स् आणि मार्डी लोहारा या ठिकाणी अगदी गुपचूप होणारे बालविवाह अगदी शेवटची घटका जवळ आली असता थांबविण्यात आले.
यावेळी सुपरवायझर (मार्डी) श्रीमती एम.एस रेणसूरे, बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विभावरी खुने, पोलीस उपनिरिक्षक पोलीस स्टेशन (लोहरा) ए.एन. वाढोरे, बीट अंमलदार (मार्डी) एच.एन.पापुलवार, समाज कार्यकर्ती प्रज्ञा बनसोडे,समुपदेशक कोमल धनवडे व क्षेत्रीय कार्यकर्ती जयश्री पाटील, बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी ग्रामसेवक (मार्डी) सय्यद एफ.आय. ,पोलीस कॉन्सेबल (उस्मानाबाद) किरण लेंडगे,अशोक पाव्हणे,बालाजी काटकर तसेच मार्डी ग्रामस्थ अण्णासाहेब पाटील, गिरी ज्ञानेश्वर,जमादार एम.एस.,सौ.कोकरे डी. व्ही. कमल बाडकर,बळी ढेंगील यांच्या प्रयत्नाने हे नियोजित बाल विवाह रोखण्यात यश मिळाले आहे.