उस्मानाबाद जिल्ह्यात पाच बालविवाह थांबवण्यात यश

 
उस्मानाबाद जिल्ह्यात पाच बालविवाह थांबवण्यात यश

 उस्मानाबाद,- जिल्हयात रुई ढोकी ,सांगवी कामेगांव,माकणी ,नागराळ,ता.लोहारा व रुईभर येथे होणारे पाच नियोजित बालविवाह जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.एच.निपाणीकर यांच्या  कार्यवाहीमुळे थांबविण्यात यश आले.

        या कार्यवाहीमध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती कोमल धनवडे (लोमटे) याच्या मार्गदर्शनानुसार मार्च महिन्यात वेगवेगळया ठिकाणी छुप्या पध्दतीने बालविवाह उरकण्याचा प्रयत्न केला जात असतांना ग्राम बाल संरक्षण व वार्ड बाल संरक्षण समितीच्या प्रयत्नाने हे नियोजित बाल विवाह रोखण्यात यश मिळाले आहे.

       बालविवाह रोखण्यास वधु व वर यांना समुपदेशन करुन तसेच त्यांच्याकडुन हमीपत्र घेऊन थांबविण्यात आला.यावेळी बाल संरक्षण अधिकारी योगेश शेगर,बाल संरक्षण अधिकारी प्रज्ञा बनसोडे,क्षेत्रीय कार्यकर्ता हर्षवर्धन सेलमोहकर तसेच प्रत्येक गावातील ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका आणि सरपंच यांच्या प्रयत्नांने नियोजित बालविवाह थांबविण्यात यश आले.

From around the web