कळंबमध्ये बनावट व अप्रमाणित औषधाचा साठा जप्त

 विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल
 
कळंबमध्ये बनावट व अप्रमाणित औषधाचा साठा जप्त

कळंब - येथे औषधी प्रशासनाने अचानक केलेल्या तपासणीत बनावट व अप्रमाणित औषधे आढळली असून संबंधित दुकानातून मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती  अशी की , काही दिवसापूर्वी जिल्हा औषधी निरीक्षक, उस्मानाबाद यांनी कळंब येथील बीकेजी एलपी संजीवनी फार्मासिटिकल या वितरकाच्या औषधी दुकानात तपासणी केली होती. या तपासणीत त्यांनी asciclo+paracetamol+ Sara Tab  या औषधी गोळ्या व  DKKEM  हे सिरप  या औषधाचे नमुने तपासले .सदरील औषधे तपासणीसाठी ताब्यात घेऊन विश्लेषणासाठी औरंगाबाद येथील अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेकडे पाठविले होते. 

या प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीत सदरील औषध बनावट व अप्रमाणित असल्याचे निदर्शनास आले .या औषधाच्या तपासणीमध्ये अनेक त्रुटी आढळल्या असून अलफिनक  हे घटक 79.06 टक्के तर सारा 52.87 टक्के इतक्‍या कमी प्रमाणात नमूद टक्केवारी पेक्षा निदर्शनास आले आहे .तसेच यामध्ये डायक्लोफिनॅक सोडियम टॅबलेट 19.3 1 मि ग्रॅ.एवढे  प्रमाण छापील  घटकापेक्षा प्रमाणात कमी  आढळले आहे. सदरील औषधही बनावट आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी सदरील औषधाची विक्री वापर व तात्काळ बंद करण्यात आले असून अंदाजे एक लाख 77 हजार 950 रुपये किमतीचा साठा जिल्हा औषध निरीक्षक दुसाने यांनी जप्त केलेला आहे. सदरील औषधे ही लाइफ विजन हेल्थकेअर हिमाचल प्रदेश या कंपनीने तयार केली आहेत . सदरील कंपनीच्या विरोधात कळंब येथील मे. न्यायालयामार्फत औषध नमुना फेर तपासणी करीता केंद्रीय औषध प्रयोगशाळा कलकत्ता यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास औषध निरीक्षक दुसाने ते करीत आहेत.

शहरातील नामांकित डॉक्टरांची कंपनी
शहरातील नामांकित डॉक्टरांनी मिळून बीकेजी एलपी ही फार्मासीट कंपनी काढली असून यामार्फत ते बनावट व अप्रमाणीत औषधे विकून जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून आले आहे. डॉक्टरांना देवदूत म्हटले जाते. मात्र, या डॉक्टरांनी बनावट औषधांची विक्री करत जनतेच्या जीवाशी खेळ केला आहे.

From around the web