टाकळी (बें) येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 
टाकळी (बें) येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पाडोळी -  उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बेंबळी) येथील युवकातर्फे आज (दि.२२) भव्य असे रक्तदान शिबिराचे अयोजन करण्यात आले होते.कोरोनाच्या साथीमुळे रक्ताचा तुटवडा भासत असल्याने एक सामाजिक बांधिलकी म्हणून येथील युवकांनी रक्तदान करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला होता.

यावेळी रक्तदात्यांना आयोजकांच्या वतीने एक भेटवस्तू आणि उस्मानाबाद येथील सह्याद्री ब्लड बँकेच्या वतीने प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. या प्रमाणपत्राचा रक्तदात्यांना पुढील काळात गरज पडल्यास मोफत रक्त पिशवी दिली जाणार आहे. 

यावेळी रक्तदात्यांना बेंबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी  डॉ.रोहित राठोड , हवालदार पटेल ,पोलीस नाईक सचिन कपाळे, श्रीपाल सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी टाकळी(बेंबळी) येथील एकूण ३२ युवकांनी रक्तदान केले.त्यामध्ये महेश कुंभार, अरुण चव्हाण,इरफान पठाण, दयानंद खटके, विकास मदने, ज्ञानेश्वर जाधव, गणेश लोखंडे, नंदकिशोर हजारे, सुनील शिखरे,  भैरु सूर्यवंशी, मिलिंद माने, बालाजी बर्डे, सुरज शेंदरे, उद्धव खटके,अनिल सूर्यवंशी, प्रसाद शिंदे, श्रीधर नरवडे, महेबुब पठाण, वैभव नरवडे, सचिन पांढरे,  वसीम पठाण, सोमनाथ सोनटक्के,बाबा सूर्यवंशी, सुनील जाधव,पवन कणसे, तानाजी नरवडे, प्रवीण सोनटक्के,गुणवंत नरवडे, शिवशांत काकडे,प्रशांत सोनटक्के, विष्णू तौर अय्याज शेख आदींनी रक्तदान केले.  

From around the web