शंभर खाटांच्या रुग्णालयासाठी जागा त्वरित देणार

    -- पालकमंत्री शंकरराव गडाख
 
d

उस्मानाबाद - येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याशिवाय माता  व बाल संगोपन विभागाच्या शंभर खाटांच्या रुग्णालयास मंजुरी मिळाली आहे.त्यास लवकरच शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.तीही जागा लवकर मिळेल,असे आश्वासन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज येथे दिले.

येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील जिल्हा नियेाजन समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या  मॉडयुलर ओ.टी.च्या लोकार्पण सभारंभाच्यावेळी औचारिक चर्चेच्या वेळी त्यानी हे आश्वासन दिले.यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निबांळकर, आमदार कैलास पाटील,जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता,आरोग्य उपसंचालक डॉ.माले, नगराध्यक्ष मकरद निबांळकर,अपर जिल्हाधिकारी रूपाली अवले,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बोडके,जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ.स्मिता सरोदे-गवळी,डॉ.सुधीर सोनटक्के, डॉ संजय सोनटक्के,डॉ. मुकुंद माने, डॉ सूर्यवंशी, डॉ अभिजित बागल,डॉ. राजेद्र शिंदे आदी उपस्थित होते.

सध्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील बेडची संख्या 60 आहे. तथापि, स्त्री रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता माता व  बालसंगोपन हा शंभर खाटांचा विभाग सुरू झाल्यास स्त्री रुग्णालयातील ताण कमी होईल.त्याच बरोबर शंभर खाटांच्या माता व बाल संगोपन विभागास मिळणाऱ्या डॉक्टर,कर्मचारी आणि इतर सुविधामुळे स्त्री रुग्णांना  सेवा देण्यास मदत होणार आहे.त्यामुळे रुग्णालयासाठी शासकीय जमीन लवकरात लवकर देण्याबाबत जिल्हाधिकारी  यांना सांगितले आहे.याबाबत जिल्हाधिकारीही सकारात्मक आहेत,त्यामुळे या शंभर खाटांच्या रुग्णालयास गती मिळेल,असे सांगून पालकमंत्री गडाख यांनी राज्यभरातील शासकीय रुग्णालयातील रिक्त पदांची भरती मोठया प्रमाणात होणार आहे.त्यात याही रुग्णालयातील रिक्त जागा भरल्या जातील,असेही त्यांनी यावेळी सप्षट केले. गरज पडली तर आपण यासाठी  पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.

उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात येणाऱ्या स्त्री रुग्णांची संख्या फार मोठी आहे.त्या दृष्टीने सध्याच्या  सेवावर ताण येतो. तेव्हा येथे 200 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास गती यावी,अशी मागणी यावेळी डॉ.स्म्तिा सरोदे-गवळी यांनी यावेळी केली. मॅडयुलर ओ.टी.च्या सुविधेमुळे शस्त्रक्रिया करताना माता व बालकांना होणार संसर्ग टाळला जाईल.कारणही अत्याधुनिक प्रणाली आहे.त्यामुळे माता व बालकांचे मुत्यूचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे.
 

From around the web