एस.पी. शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा आदेश 

 
एस.पी. शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा आदेश

उस्मानाबाद - एस.पी. शुगर चे चेअरमन तथा तडवळा गावचे उपसरपंच सुरेश पाटील यांच्यावर अधिकार नसताना दोन बोगस वारसा प्रमाणपत्र दिले बाबत जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.

 सुरेश पाटील यांनी अधिकार नसताना मयत मुरलीधर कदम यांच्या नावाचे दोन वेगवेगळे वारसा प्रमाणपत्र दिगंबर कदम यांना दिले होते. याला आक्षेप घेत  तडवळा येथील ग्रामस्थ सुभाष कदम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली होती. तसेच तक्रारीची दखल न घेतल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. 

त्या अनुषंगाने आज उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा. पं) यांनी उपसरपंच सुरेश पाटील, लिपिक रवींद्र घोरपडे, आणि प्रमाणपत्र हस्तगत करणारे दिगंबर कदम यांच्यावर गुन्हे नोंद करण्याचे आदेश गट विकास अधिकारी पंचायत समिती उस्मानाबाद यांना दिले आहेत.

हाच तो आदेश 

From around the web