पाडोळी : विजेचा शॉक लागून तरुण पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

 


 पाडोळी : विजेचा शॉक लागून तरुण पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू



पाडोळी
- सोलापूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल रामेश्वर अरुण मोहिते (वय २८ ) यांचे आज (दि. १०) शेतामध्ये काम करत असताना विद्युत शॉक लागून दुःखद निधन झाले. उस्मानाबाद तालुक्यातील चिखली येथील ते रहिवासी होते. 


लहानपणीचं वडिलांचे छत्र हरविल्यानंतर  अतिशय कठीण परिस्थितीमधून रामेश्वर हा पोलिस भरती झाला होता. रामेश्वर याचे अवघ्या चार महिन्यापूर्वीच लग्न ही पार पडले होते.


रामेश्वर हा कष्टकरी कुटुंबातील लहानपणी वडिलांचे छत्र हरवलेले असताना, आईची माया आणि जिद्द , चिकाटी मेहनतीच्या जोरावर, पाच सहा वर्षापासुन ,महाराष्ट्र पोलीस दलांमध्ये कार्यरत असणारा, होतकरू तरुण . आज काळाच्या पडद्याआड गेला. अत्यंत नम्र व शिस्तप्रिय असणारा, चिखली गावचा कोहिनूर हिरा, आज निघून गेल्याने  चिखली गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.. 


रामेश्वर मोहिते यांचे अचानक निधन झाल्यामुळे सर्वाना धक्का बसला आहे, फेसबुक व्हाट्सएप वर भावपूर्ण श्रद्धांजलीचे संदेश आणि त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.


From around the web