थोडासा दिलासा : कोरोना रुग्ण संख्या आणि मृत्यू संख्या घटली
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज २६ मे ( मंगळवार ) रोजी ३०६ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ३४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ५ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली असून, मृत्यू संख्येतही घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी थोडासा सुस्कारा सोडला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५३ हजार ४९० रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ४८ हजार १८५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १२०१ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४१०४ झाली आहे .
कोरोना झाल्यास कोविड सेंटर मध्ये भरती व्हावे लागणार
उस्मानाबाद जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १९.३२ असल्याने गृह विलीगीकरण ( होम आयसोलेशन ) बंद करण्यात आले असून, कोरोना झाल्यास घरी उपचार न घेता कोविड सेंटर मध्ये भरती व्हावे लागणार आहे.
.