उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे सहा गुन्हे दाखल 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे सहा गुन्हे दाखल

उस्मानाबाद - साठेनगर, उस्मानाबाद येथील अतुल महादेव चव्हाण हे 24 फेब्रुवारी रोजी 00.30 वा. सु. उस्मानाबाद येथील भानुनगर येथील रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी पुर्वीच्या भाडणांच्या कारणावरून उस्मानाबाद येथील अशोक देवकते, नरसिंग मिटकरी, रवी देवकते, हर्षद ठवरे, संतोष ठवरे, रामेश्वर देवकते, बच्चा देवकते अशा 7 जणांनी अतुल चव्हाण यांना अडवून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, विटेने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अतुल चव्हाण यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 324, 323, 504, 506, 143, 147, 149 आणि ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 परंडा: तांबेवाडी, ता. भुम येथील मोहिनी व महादेव वसंत मुळे या दोघा पती- पत्नींनी 22 फेब्रुवारी रोजी 20.00 वा. सु. शेजारी-धनाजी बाबुराव मुळे यांना पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जखमी केले. याप्रसंगी धनाजी यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या पत्नीसही नमूद दोघांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या धनाजी मुळे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी: पारधी पिढी, पारा, ता.वाशी येथे पिंटु शिंदे, मुरली शिंदे, बबलु शिंदे, सुनिल शिंदे, सोनु पवार या सर्वांनी पुवीच्या भांडणाच्या कारणावरुन 25 फेब्रुवारी रोजी 00.30 वा. सु. नातेवाईक- सुनिल शिंदे, रा. जामखेड, जि. अहमदनगर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच सुनिल शिंदे यांच्या कारच्या काचा फोडून आर्थिक नुकसार केले. यावरुन सुनिल शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 427, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 तर याच घटनेत कैलास रामा पवार, रा. शिवशक्तीनगर, वाशी यांनी प्रथम खबर दिली की, ते 25 फेब्रुवारी रोजी 00.30 वा. इंद्रा पारधी पिढी येथे असतांना सुनिल शिंदे, रा. जामखेड यांनी कैलास यांना शिवीगाळ करुन चाकूने वार करुन जखमी केले. यावरुन भा.दं.सं. कलम- 324 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 बेंबळी: गावात होत असलेल्या अवैध मद्य विक्री विरोधात चिखली, ता. उस्मानाबाद येथील राजेंद्र चंद्रकांत आवटे यांनी आवाज उठवला होता. त्याचा राग मनात धरुन गावकरी- रमन नवनाथ ढवळे यांसह अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी 25 फेब्रुवारी रोजी 17.30 वा. सु. चिखली चौकात राजेंद्र आवटे यांची कार आडवून आवटे यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच त्यांच्या कारची समोरील काच फोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या राजेंद्र आवटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 341, 336, 427, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : देवकते गल्ली, उस्मानाबाद येथील रोहित देवकते यांनी 25 फेब्रुवारी रोजी भाऊबंद- बबलु देवकते यांना “तु आमच्या विषयी लोकांत विरोधी भुमीका का घेतो.” असा जाब गल्लीत असतांना विचारला. यावर बबलु यांनी रोहित यांस शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जखमी करुन रोहित यांस वाचवण्यास आलेला त्यांचा मित्र- अमोल यासही मारहाण केली. अशा मजकुराच्या रोहित देवकते यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

आंबी: तांदुळवाडी, ता. परंडा येथील महादेव उदागे यांना शिवीगाळ केल्याचा जाब त्यांचा मुलगा- भारत उदागे यांनी गावकरी- गणेश व हनुमंत व्हरे या दोघा पिता- पुत्रांस फोनद्वारे विचारला होता. यावर चिडून जाउन त्या दोघांनी 24 फेब्रुवारी रोजी 21.00 वा. सु. महादेव उदागे यांच्या घरात घुसून महादेव यांसह त्यांची पत्नी- सुशिला व मुलागा- भारत अशा तीघांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुशिला उदागे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद पिता- पुत्रांविरुध्द भा.दं.सं. कलम- 324, 323, 452, 504, 34 आणि ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web