निशब्द : उस्मानाबाद जिल्ह्यात १७ एप्रिल रोजी ६५३  पॉजिटीव्ह, २० मृत्यू 

चार दिवसात ६७ जणांचा मृत्यू 
 
निशब्द : उस्मानाबाद जिल्ह्यात १७ एप्रिल रोजी ६५३ पॉजिटीव्ह, २० मृत्यू

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज १७  एप्रिल ( शनिवार ) रोजी तब्बल ६५३  जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ५७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात २० कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. गेल्या चार दिवसात ६७ जणांचा मृत्यू  झाल्याने  घबराट पसरली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार ७७ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २२ हजार ६०९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ७१० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५७९५ झाली आहे. 

गेल्या चार दिवसात झालेले मृत्यू 

१४ एप्रिल - १४
१५ एप्रिल - १०
१६ एप्रिल -२३
१७ एप्रिल - २०

 

From around the web