निशब्द : उस्मानाबाद जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी ४७७ पॉजिटीव्ह, १६ मृत्यू
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज १८ एप्रिल ( रविवार) रोजी तब्बल ४७७ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ३६० रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात १६ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. गेल्या पाच दिवसात ८३ जणांचा मृत्यू झाल्याने घबराट पसरली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार ५५४ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २२ हजार ९६६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ७२५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५८६३ झाली आहे.
गेल्या चार दिवसात झालेले मृत्यू
१४ एप्रिल - १४
१५ एप्रिल - १०
१६ एप्रिल -२३
१७ एप्रिल - २०
१८ एप्रिल - १६
- उस्मानाबाद जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट राज्यात सर्वाधिक
- मागील आठवड्याचा राज्यशासनाचा रिपोर्ट जाहीर (10 ते 16 एप्रिल)
- उस्मानाबाद जिल्हयात टेस्ट केल्यापैकी सुमारे 40 टक्के रुग्ण येत आहेत पॉझिटिव्ह
- संसर्गाच्या फैलावाचा वेग रोखण्यास जिल्हा प्रशासनाला अपयश
- राज्याच्या सरासरी पॉझिटिव्हीटी रेट पेक्षा 15 टक्के अधिक आहे उस्मानाबाद जिल्हयाचा रेट
राज्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्हीटी रेट असणारे जिल्हे
- उस्मानाबाद-39.82
- हिंगोली- 39.29
- परभणी- 36.85
- नागपूर- 35.32
- पालघर- 34.49
राज्यात सर्वात कमी कोरोना पॉझिटिव्हीटी रेट असणारे जिल्हे
- जळगाव -7.62
- यवतमाळ -8.85
- धुळे -9.20
- अमरावती 10.57
- अकोला-10.91
उस्मानाबाद जिल्हयातील वाढलेला हाच पॉझिटिव्हीटी रेट लोकांसाठी जीवघेणा ठरण्याची शक्यता. जिल्हा प्रशासनाने कठोरपणे परिस्थिती हाताळण्याची गरज