श्री तुळजाभवानीचे मंदिर ७ ऑक्टोबरपासून भाविकांसाठी खुले 

दररोज १५ हजार भाविकांना प्रवेश : कोजागिरी पौर्णिमा रद्द : कडक नियमांची अंमलबजावणी 
 
s

तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव येत्या ७ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. याचदिवशी कोरोनामुळे बंद आलेले मातेचे मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. मात्र  दररोज मात्र 15 हजार भाविकांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. 

 नवरात्रोत्सव काळात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक तुळजापूर येत असतात. शेजारील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही भाविक दर्शनासाठी तुळजापुरात येत असतात. त्यामुळे रोज 15 हजार भाविकांची मर्यादा वाढवण्यात यावेळी अशी मागणी स्थानिक नागरिक, पुजारी आणि भाविकांकडून होत आहे.

सायंकाळी  सहा वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिर खुले 

तुळजा भवानी मंदिर भाविकांसाठी येत्या 7 ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजल्यापासून भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीच्या प्रशासनाने  दिली.

७ ऑक्टोबर रोजी पहाटे तुळजाभवानी देवीची मूळ मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता देवीच्या सिंह गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात येईल. त्यानंतर शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे. मंदिर पहाटे उघडण्यात येणार असले तरी भाविकांना, तसंच पूजारी व सेवेकरींनाही तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी 6 तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. घटस्थापना झाल्यावर देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक, पुजारी उत्सुक असतो. मात्र त्याला दर्शनासाठी वाट पाहावी लागणार आहे.


यासंदर्भात तुळजा भवानी मंदीर समितीने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये पुजारी , सेवेधारी यांना 7 ऑक्टोबर ला सायंकाळी सहा वाजल्यापासून मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. सोबत पुजार्यांनी ओळखपत्र ठेवणे आवश्यक आहे. तुळजा भवानी मंदिरात भाविकांचे गाभारा आणि मंदिर परीसरात कोणतेही कुलाचार, विधी , करता येणार नाहीत. 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दुध॔र आजारग्रस्त व्यक्ती , गरोदर स्त्रियांना तसेच 10 वर्षाखालील बालकांना मंदीरात प्रवेश दिला जाणार नाही.


मंदीर प्रवेशावेळी मास्क घालणे अनिवार्य आहे. भाविकांना 6 ऑक्टोबर 2021 पासून प्रवेश पाससाठी नोंदणी करता येणार आहे. तुळजा भवानी मंदीरात पुजार्यांना ड्रेस कोड मध्ये असणे आवश्यक असणार आहे. तसेच तुळजा भवानी मातेची कोजागिरी पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. त्यादिवशी महंत, पुजारी, सेवेधारी, मानकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व धार्मिक विधी परंपरेने पार पडणार आहेत. तुळजा भवानी मंदिर समितीच्या व्यवस्थापक तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांनी यासंदर्भात वरील माहिती पत्रकाद्वारे दिली आहे

असे आहेत नियम .. 

  • शारदीय नवरात्र महोत्सव 2019 साली पुजाऱ्यांना दिलेले ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य
  •  मास्क बंधनकारक राहणार
  • मंदिरात पुजाऱ्यांना प्रवेश करते वेळी ड्रेसकोड आवश्यक
  •  मंदिर गाभारा आणि मंदिर परिसरात भाविकांचे कोणतेही कुलाचार विधी होणार नाहीत.
  • कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्या भाविकांनाच मंदिरात दर्शनासाठी प्रवेश
  • मंदिरात 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारग्रस्त, गरोदर स्त्रिया व 10 वर्षाखालील बालकांना प्रवेश नाही

कोजागिरी पौर्णिमा रद्द

मंदिरात मर्यादित स्वरूपात ऑनलाईन प्रवेश पासची सुविधा मंदिराच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे. मात्र हे ऑनलाईन पास 15 हजार भाविकांपैकी असतील की अतिरिक्त हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंदिर परिसरातील 200 मीटरपर्यंत सोललेले नारळ आणि सुटे तेल विक्री करण्यास बंदी असणार आहे. कोजागिरी पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर 18 ते 20 ऑक्टोबर या 3 दिवसात तुळजापूर शहर व्यतिरिक्त इतरांना तुळजापूर शहरात प्रवेश बंदी असणार आहे. सर्व भाविकांनी प्रशासनाकडून केलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने करण्यात आले आहेत.

From around the web