अणदूर : श्री खंडोबा यात्रा कोरोनामुळे रद्द 

प्रथेप्रमाणे मूर्ती नळदुर्गला जाणार 
 
अणदूर : श्री खंडोबा यात्रा कोरोनामुळे रद्द

तुळजापूर - तालुक्यातील अणदूरच्या श्री खंडोबाची १५ डिसेंबर रोजी भरणारी यात्रा कोरोनामुळे  रद्द करण्यात आली आहे, मात्र प्रथेप्रमाणे श्री खंडोबाची मूर्ती  नळदुर्गच्या मंदिरात नेण्यात येणार आहे. 

अणदूर आणि नळदुर्ग ही  दोन वेगवेगळी गावे  आहेत, मात्र खंडोबाची मूर्ती एकच आहे. अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्ग येथे पावणे दोन महिने मूर्ती असते. अणदूरची  यात्रा पार पडल्यानंतर मूर्ती नळदुर्गला नेण्यात येते मात्र कोरोनामुळे अणदूरची  यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा  भव्य आखाडा भरविला जातो, मात्र तोही रद्द करण्यात आला आहे. 

नळदुर्ग हे श्री खंडोबा - बाणाई विवाह स्थळ असल्यामुळे आणि मूर्ती स्वयंभू आणि जागृत स्थळ असल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यातून लाखो भाविक यात्रेसाठी येत असतात, मात्र कोरोनाचा फटका यात्रेला बसला आहे . 

अशी असेल कार्यक्रम पत्रिका 


 

From around the web