धक्कादायक : विद्यार्थ्यांना प्लॉस्टिकच्या तांदळाचा पुरवठा

महाराष्ट्र महिला बचत गट महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
 
sd

उस्मानाबाद - जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिड डे मिल योजनेच्या माध्यमातून दररोज शाळेतच जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. मात्र कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. त्यांना घरीच कोरड्या अन्नाचा पुरवठा करण्यात येत असून पुरवठा करण्यात येत असलेले तांदूळ निकृष्ट दर्जाचे आहे. तांदूळ चक्क प्लॉस्टिकच्या तुकड्याचा असल्याचे समोर आले आहे. 

पुरवठा करण्यात आलेला तांदुळ प्लॉस्टिकची असल्याने पुरवठादारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र महिला बचत गट महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात मागील वीस वर्षापासून मिड डे मिल पुरवठा करणारा एकच गुत्तेदार असून तो ही कोरडा पुरवठा करत आहे. शासनाच्या धोरणानुसार स्थानिक बचत गटाद्वारे किंवा संस्थेद्वारे सेंट्रल किचनच्या माध्यमातून पुरवठा करण्यात यावा असे निर्देश आहेत. मात्र तसे होत नसुन या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. गुत्तेदार विद्यार्थ्यांना चक्क प्लॉस्टिकच्या तांदळाचा पुरवठा करत आहे. अशा गुत्तेदारावर अन्न भेसळ काययद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर ऍड.मनिषा पाटील, अनिता तोडकरी, कल्पना गायकवाड, मिना सोमाजी, माया चव्हाण आदींच्या स्वाक्षर्या आहेत.

d

From around the web