धक्कादायक : उस्मानाबाद जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी ३४३  कोरोना पॉजिटीव्ह 

 
जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या २२९६

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज ३ एप्रिल ( शनिवार ) रोजी तब्बल ३४३ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर १५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २२९६ झाली आहे. तसेच दोन रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार ४५३  रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १८ हजार ५५५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६०२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर रिपोर्ट पाहा 

From around the web