परंड्यात शिवसेनेचे तालुका प्रमुख अण्णा जाधव गंभीर जखमी 

परंडा तालुक्यात शिवसेनेत राडा ; शिवसैनिक आपापसात भिडले 
 
s

उस्मानाबाद - जिल्ह्यामध्ये शिवसेना व युवा सेनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शिवसंपर्क अभियानास  एकीकडे मोठा प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे याच अभियानातून  परंडा  शिवसेनेत मोठा राडा झाला आहे.  तालुका प्रमुख अण्णा जाधव  यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. तब्बल २५ जणांनी लाठ्या काठ्या, बाटल्या घेऊन हा हल्ला केला असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेनेचे तालुका प्रमुख अण्णा जाधव यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा फोटो बॅनरवर न लावल्याने हा वाद झाल्याचे समजतेय. 

परंडा तालुक्यात पूर्वी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे वर्चस्व होते. या तालुक्यात आमदार तानाजी सावंत यांचा शिरकाव झाल्यापासून ज्ञानेश्वर पाटील यांचे शिवसेनेत महत्व कमी झाले आहे.लोकसभा निवडणुकीत त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरुद्ध उघड भूमिका घेतली होती. खासदार ओमराजे, आमदार तानाजी सावंत यांची त्यांच्यावर नाराजी आहे, त्यात परंडा तालुक्यात सुरु असलेल्या शिवसंपर्क अभियानात ज्ञानेश्वर पाटील यांचा फोटो बॅनरवर न लावल्याने शिवसैनिक आपापसात भिडले आहेत. 

शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचा जुना वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असून दोन्ही आजी माजी आमदारांनी यावर मात्र अद्यापपर्यंत कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

From around the web