नारायण राणे विरुद्ध शिवसेना आक्रमक
उस्मानाबाद - भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अवमान केला आहे. त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास दि.२४ ऑगस्ट रोजी जोडे मारुन निषेध आंदोलन केले.
भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील चार नेत्यांना केंद्रीय मंत्री मंडळात संधी दिली आहे. शपथविधी झाल्यानंतर या मंत्राच्या माध्यमातून राज्यात जन आशिर्वाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. मात्र सतत वादग्रस्त व बेताल वक्तव्य करून खळबळ माजवून सर्वत्र वादंग निर्माण करण्यात पटाईत असलेले नारायण राणे यांनी दि.२३ ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरुन, अवमानजनक वक्तव्य करून त्यांचा अवमान केला आहे. त्यामुळे राणे यांच्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेनेच्यावतीने नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारुन आंदोलन करण्यात आले. तसेच त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी हातात कोंबड्या घेऊन कोंबडीचोर राहण्याचा निश्चय असो यासह विविध निषेधात्मक घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, तालुका प्रमुख सतीश सोमाणी, जिल्हा उपप्रमुख सुधीर सस्ते, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, भिमा जाधव, एच.एम. देवकाते, पंकज पाटील,विजय ढोणे, उपशहर प्रमुख प्रशांत साळुंके, युवा सेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अक्षय ढोबळे, बाळासाहेब काकडे, युवा सेना जिल्हा उपप्रमुख विजय राठोड, युवराज राठोड, वैभव वीर, बंडू आदरकर, विजय घोणे, कृष्णा साळुंके, संकेत सूर्यवंशी, रवी कोरे, सौदागर जगताप, अमोल मुळे, मोईन पठाण, संदीप गायकवाड, पांडुरंग माने, सत्यजित पडवळ, अभिजीत देशमुख, महेश लिमये व राहुल निंबाळकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
कळंबमध्ये रास्ता रोको
कळंब शहरात नारायण राणे विरुद्ध शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको करून घोषणाबाजी करण्यात आली. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या नेतृवाखाली हे आंदोलन करण्यात आले.