शरद पवार यांचा उस्मानाबादच्या नामांतरास पाठींबा ?
मुंबई - CMOMaharashtra या अधिकृत फेसबुक पेज आणि ट्विटर हँडलवरून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर, उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करण्यात आला आहे.त्याला काँग्रेसने आक्षेप घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मात्र याबाबत मौन बाळगले आहे.
नामांतराच्या विषयावरुन सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, “आमच्यात वाद नाहीत. संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा, नाहीतर अजून काही म्हणा..या प्रकरणाकडे मी गांभीर्यानं बघत नाही. त्यामुळे मी कधीही भाष्य केलं नाही”.पवार यांच्या भूमिकेने मुख्यमंत्र्यांना पाठबळच मिळाले असून विरोध करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची मात्र मोठी गोची झाली आहे.
शरद पवार यांनी, औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबाबत मौन बाळगल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका समजू शकली नाही, मात्र त्यांचा अप्रत्यक्ष पाठींबा असल्याचे जाणकारांचे मत आहे.