उस्मानाबाद जिल्हयातील 230 प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर

 
asd

   उस्मानाबाद - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 230 प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी अनुज्ञेयतेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उस्मानाबाद तथा अध्यक्ष वरिष्ठ, निवड श्रेणी नियुक्त समिती यांच्या अध्यक्षतेखाली राहुल गुप्ता  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात दि. 16 डिसेंबर-2021 रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक),समिती सदस्य तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी,उपशिक्षणाधिकारी  (प्राथमिक) आणि कार्यालयीन शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.

       बैठकीमध्ये सदस्य सचिव यांनी अध्यक्ष आणि सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणीसाठी आवश्यक असलेल्या शासन निर्णयानुसार वाचन करण्यात आले.त्यानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी अनुज्ञेयतेसाठी प्रशिक्षीत अर्हतेसह प्राथमिक शिक्षक पदावरील सलग 12 वर्षे सेवा झालेल्या तसेच दोन वर्षाचे गोपनीय अहवाल समाधानकारक असलेल्या आणि सर्व शिक्षा अभियान योजनेअंतर्गत एका शैक्षणिक वर्षातील 21 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण असणे या अटी पूर्ण करणाऱ्या शिक्षकांनाच या वेतनश्रेणी अनुज्ञेय करता येते. या बाबी निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. तद्नंतर तालुकानिहाय  उस्मानाबाद -59, तुळजापूर-105, उमरगा- 84, भूम- 42, परंडा- 39    लोहारा- 41, कळंब- 64, वाशी- 35 अशा एकूण सादर केलेल्या सर्व 469 प्रस्तावांची समिती सदस्य, उपस्थित गटशिक्षणाधिकारी आणि कार्यालयीन शिक्षण विस्तार अधिकारी यांनी पडताळणी केली. वरिल तपासलेल्या सर्व प्रस्तावांपैकी 230 प्राथमिक शिक्षकांचे प्रस्ताव वरील निकषांचे पुर्तता करत असल्यामुळे उक्त परिशिष्टात दर्शविलेल्या दिनांकापासून देय आणि अनुज्ञेय वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात येत आहे. सादर केलेल्या 469 प्रस्तावांपैकी 239 प्रस्ताव यामध्ये विहित निकषांची पुर्तता न केल्यामुळे या  प्रस्ताव पुढील बैठकीमध्ये निकष पुर्ण करुन ठेवता येतील काय? याबाबत खात्री करावी. खात्री झाल्यास पुनश्च: सादर करावेत. अशा सूचना सर्व सूचना सर्व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

        या प्रमाणे कामकाज पुर्ततेनंतर निवड श्रेणी नियुक्त समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी, कार्यालयीन शिक्षण विस्तार अधिकारी यांचे आभार व्यक्त करुन बैठक संपविण्यात आली. तद्नंतर उक्त 230 प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी अनुज्ञेयतेसाठी आदेश पारित करण्यात आले आहेत.    


              

From around the web