गृह विलगिकरणातील रुग्णांच्या उपचारासाठी खाजगी वैदकीय अधिकाऱ्यांची सेवा घ्या           

जिल्हाधकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश
 
गृह विलगिकरणातील रुग्णांच्या उपचारासाठी खाजगी वैदकीय अधिकाऱ्यांची सेवा घ्या

 उस्मानाबाद -  कोरोनाची सौम्य बाधा झालेल्या  रुग्णास गृह विलगिकरणात रुग्णाच्या सहमतीने आणि त्याच्या घरी योग्य सोया असेल तर ठेवण्यात येत आहे .आशा रुग्णांना वैद्यकीय सल्ला व मदत देण्याकरिता खाजगी वैद्यकीय अधिका-यांची सेवा घेण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे जरी केले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस  कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे .शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णांवर कोविड रुग्णालये (DCH, DCHC), कोविड केअर सेंटर्स (CCC) येथे उपचार करण्यात येत आहेत. तसेच शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणामध्ये (HOME ISOLATION) ठेवण्यात येत आहे .  गृह विलगीकरणातील रुग्णांच्या तब्येतीवर लक्ष ठेवणे आणि अशा रुग्णांना काही त्रास होत असल्यास त्यांना आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शन व सल्ला देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांची सेवा घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे  जिल्हाधिकारी श्री . दिवेगावकर यांनी   जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी  यांना जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय अधिकारी यांची यादी तयार करुन शहरी व ग्रामीण भागात वार्डनिहाय खाजगी वैद्यकीय अधिकारी यांना नियुक्त करावे व त्यांना गृह विलगीकरणातील (HOME ISOLATION) रुग्णांच्या तब्येतीवर लक्ष ठेवणे व अशा रुग्णांना काही त्रास होत असल्यास त्यांना आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शन व सल्ला देण्याबाबत आदेशित करावे , असे आदेश दिले आहेत .

From around the web