शेगर यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी स्वयंस्पष्ट खुलासा शासनास तात्त्काळ सादर करण्याचे निर्देश

 
s

धाराशिव   - जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम विभागात कार्यरत असलेले तत्कालीन उपकार्यकारी अभियंता हरिभाऊ रामचंद्र शेगर यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी स्वयंस्पष्ट खुलासा शासनास तात्त्काळ सादर करण्याचे निर्देश  उप सचिव पो.द. देशमुख यांनी दिले आहेत., 


जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम विभागात कार्यरत असलेले तत्कालीन उपकार्यकारी अभियंता हरिभाऊ रामचंद्र शेगर यांनी अवैधरित्या कोट्यवधीची मालमत्ता जमविलेली आहे. त्यामुळे शेगर यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी एका पत्राद्वारे ठोस पुराव्यानिशी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे दि.१६ फेब्रुवारी रोजी केली होती. 


या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी ठोस कारवाई न करता,  शेगर यांच्याशी  संगनमत करुन, हेतुपुरस्सरपणे कुठलाही निर्णय न देता बांधकाम विभागास संचिका परत करुन प्रकरणात संबंधित शेगर यांना अभय दिले असल्याने सेवानिवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती विषयक इतर लाभ देऊन शासनाचे कधीही न भरुन येणारे अतोनात नुकसान केले  आहे.  

याप्रकरणी झेडपीचे सीईओ राहुल गुप्ता यांच्याविरुद्ध सुभेदार यांनी राज्य शासनाकडे तक्रार दाखल केली असता महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने त्याची गंभीर दखल घेत सुभेदार यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने राहूल गुप्ता यांना ३० दिवसाच्या आत स्वयंस्पष्ट खुलासा शासनास सादर करण्याचे शासनाचे उप सचिव पो.द. देशमुख यांनी निर्देश दिले होते, परंतु गुप्ता यांनी ३० दिवसांत खुलासा सादर केला नाही, त्यामुळे उप सचिव पो.द. देशमुख  यांनी समरणपत्र पाठवत स्वयंस्पष्ट खुलासा शासनास तात्त्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

s

From around the web