उपजिवीका भागत नसल्याने उस्मानाबादेत सलून दुकानदाराची आत्महत्या

 सरकारने सलून दुकान बंद केल्यामुळे हतबल होऊन उचलले टोकाचे पाऊल 
 
उपजिवीका भागत नसल्याने उस्मानाबादेत सलून दुकानदाराची आत्महत्या

उस्मानाबाद - तालुक्यातील सांजा गावातील मनोज झेंडे या नाभिक समाज बाधवाचे सलुन दुकान होते,घरची परिस्थिती बेताची दैनंदिन सलून व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे मात्र काही दिवसांपासून सलून बंद झाल्याने अन गतवर्षी एका मुलीचे लग्न केल्याने कर्जबाजारी झाला होता, सरकारने सलून दुकाने बंद केल्यामुळे तसेच कुटुंबाची उपजिवीका भागत नसल्याने व आर्थिक  देणे पाणी झाल्याने विष पेऊन आत्महत्या केली असून मरण्यापुर्वी त्यांनी  चिठीत हे सर्व नमुद केले आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथील मनोज झेंडे यांच्या कुटुंबात 2 मुलगे एका मुलीचे गतवर्षी लग्न झाले असून पत्नी असा परिवार आहे,रोज सलून दुकानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या कमाईवर घरप्रपंच सुरू असायला,कोरोना आला अन सर्व काही बघडत गेले, मागचे वर्ष ही असंच गेले अन आता कुठे व्यवस्था सुरळीत होत असताना पुन्हा सलून दुकाने बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला त्यामुळे घरगाडा चालवताना आर्थिक समस्या निर्माण होत होत्या,आधीच डोक्यावर कर्जाचा ओझं अन आता हाताला काम नसल्याने मनोज झेंडे यांनी विष प्राशन करून टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

सरकारने हातावरचे पोट असणाऱ्या सलून दुकानदाराला कोरोनाचे नियम अटीशर्थी लावून काम करण्याची परवानगी द्यावी अन्यथा प्रत्येक नाभिक  बांधवांना अर्थिक मदत करावी तसेच सांजा येथील मयत मनोज झेंडे यांच्या कुटुंबीयांना अर्थिक मदत करावी असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळ उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केली आहे.

From around the web