उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये विनापरवाना बायो डिझेलची विक्री 

 जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 
 
sd

उस्मानाबाद  - उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विनापरवाना होत असलेल्या बायोडीझेलच्या विक्रीवर कार्यवाही करावी, यासाठी उस्मानाबाद जिल्हा पेट्रोल पंप चालक / मालक असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

केमिकलच्या नावाने गुजरात राज्यातून बायोडीझेलचे टँकर आणले जातात व उमरगा तालुक्यामध्ये कर्नाटक सीमेवर व तुळजापूर तालुक्यामध्ये विक्री चालू आहे.कलेक्टर ऑफिसची परवानगी नसताना व काही पंप सिल केले असतानासुद्धा बायोडीझेलची विक्री चालू आहे. जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अवैध बायोडीझेल विक्रीवर कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

यावेळी उस्मानाबाद जिल्हा पेट्रोल पंप चालक / मालक असोसिशनचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, रविंद्र शेरखाने,अब्दुल सत्तार,प्रशांत कुदाळ,गिरीश हंबीरे,गोपाळ देशमुख,अभिजित मोहेकर, प्रतिक्षित खामकर,वैभव उंबरे,महादेव कांबळे तसेच सर्व डीलर उपस्थित होते.

d

From around the web