संत गोरोबा काकांच्या घराचे काम निकृष्ट 

कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी 
 
संत गोरोबा काकांच्या घराचे काम निकृष्ट
तेर येथील संतश्रेष्ठ श्री संत गोरोबा काका यांच्या प्राचीन घराच्या दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट  झाल्याने घराला गळती लागली आहे. याप्रकरणी कंत्राटदारावर कठोर कारवाई करुन कोसळलेल्या छताची तातडीने दुरुस्ती करुन घेण्याच्या सुचना आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी केली आहे.  

उस्मानाबाद - संतश्रेष्ठ श्री संत गोरोबा काका यांच्या प्राचीन घराच्या दुरुस्तीच्या कामाची फेर तपासणी करुन गुणवत्ते नुसार काम झाले नसल्यास कंत्राटदारावर कठोर कारवाई करुन कोसळलेल्या छताची तातडीने दुरुस्ती करुन घेण्याच्या सुचना आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांना केल्या आहेत. त्याच प्रमाणे तेर नगरीचा एकात्मिक विकास आराखडा बनविण्याच्या अनुषंगाने देखील यावेळी चर्चा झाली.

संत श्रेष्ठ श्री. संत गोरोबा काका यांचा सहवास लाभलेल्या तेर (तगर) नगरीला ऐतिहासिक व धार्मिक वारसा आहे. येथे अनेक प्राचीन मंदिरे असुन पुरातत्वीय अवशेष सापडलेले आहेत. प्राचीन  काळी तगर हे प्रमुख व्यापारी केंद्र होते. याशिवाय संत परंपरेत तेर नगरीला अनन्य साधारण महत्व आहे. येथे बौध्द, जौन, शौव, शाक्त, वौष्णव अशा सर्व धार्मिक संाप्रदायाशी निगडीत वास्तु आढळून येतात.

श्री. संत गोरोबा काकांचे पुरातन घर राज्य पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक घोषीत केले असून या घराच्या दुरुस्तीसाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला होता. परंतु काम निकृष्ठ दर्जाचे  झाल्यामुळे घराचा छत कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.या पाश्र्वभूमीवर आ. राणाजगजितसिंह पाटीलयांनी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांची भेट घेतली. अल्पावधीतच घराला गळती लागल्याने तसेच छत कोसळल्याने याकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  या  कामाची फेर तपासणी करुन गुणवत्ते प्रमाणे काम न झाल्याचे आढळून आल्यास संबंधीत कंत्राटदारावार कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक  अजीत खंदारे यांना झालेल्या नुकसानीची पाहणी करुन संबंधीत कंत्राटदाराकडून तातडीने दुरुस्ती करुन घेण्याच्या सुचना देण्याचे संचालकांनी आदेशीत केलेे आहे.

यावेळी तेरच्या एकात्मिक विकास आराखडयाबाबत देखील यावेळी चर्चा झाली. पुरातत्व विभागाच्या संचालनालयामध्ये त्रिविक्रम मंदिराचा फोटो असून विद्यमान संचालकाना देखील तेर बाबत प्रचंड आस्था आहे. पुरातत्व विभाग व तेरणा पब्लिक च्ॉरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या भागाचा बृहत विकास आराखडा बनविण्याचा निर्णय झाला असून महिनाभरात आराखडा बनविण्यासाठी सल्लागार वस्तू विशारद निवडणे व सहा महिन्यात आराखडा बनविण्याचे ठरले आहे.

तेर नगरीचे पुरातत्वीय धार्मिक व पर्यटन दृष्ट्या अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन असणारे त्रिविक्रम मंदिर, चौत्यगृह, पांढरीची टेकाडे, तीर्थ कुंड, संत गोरोबा काका व श्री. कालेश्वर मंदिर समुह, उत्रेश्वर मंदिर, सिध्देश्वर मंदिर, नृसिंह मंदिर, जौन मंदिर व इतर पुरातत्वीय दृष्टीने अत्यंत महत्वपुर्ण मंदिरे, वास्तु यांचा एकत्रित पुरातत्वीय शास्त्रसंकेता नुसार जतन, संवर्धन व पर्यटन वाढीच्या दृष्टीने तज्ञ वास्तु विशारदा मार्फत बृहत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. 

From around the web