सोनेगावात दोन बिबट्या आल्याची अफवा 

वन विभागाचे पथक गावात दाखल 
 
सोनेगावात दोन बिबट्या आल्याची अफवा

उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील सोनेगाव ( भानसगाव ) येथे दोन बिबट्या आल्याची अफवा पसरली आहे. एका शेतकऱ्याच्या फ़ॉर्म हाऊसमधील  सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यात बिबट्या आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यानी  हा दावा फेटाळला असून, ते बिबट्या नसून मांजर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोनेगावात खरंच  बिबट्या आले आहेत का ? याबाबत गूढ वाढलं आहे.दरम्यान, वन विभागाचे एक पथक सोनेगावात दाखल झाले आहे. 

उस्मानाबाद शहराजवळ असलेल्या घाटंग्री गावाच्या परिसरात  शनिवारी पहाटे एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला होता, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री सोनेगावात दोन बिबट्या आल्याची अफवा पसरली आहे. इतकेच काय तर एका शेतकऱ्याच्या फ़ॉर्म हाऊसमधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून, त्यात बिबट्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

वन विभागाच्या अधिकाऱ्यानी  हा दावा फेटाळला आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील ते बिबट्या नसून मांजर असल्याचे  वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाचे एक पथक सोनेगावात दाखल झाले आहे. 

वन अधिकाऱ्याना  कुठेही बिबट्याचे ठसे आढळून आले नाहीत किंवा तसा पुरावा अद्याप सापडलेला नाही. ज्या शेतकऱ्याच्या शेतातील सीसीसीटीव्ही फुटेज आहेत, त्यांनी देखील प्रत्यक्ष पाहिलेले  नाही. त्यामुळे सोनेगावात खरंच  बिबट्या आले आहेत का ? याबाबत गूढ वाढलं आहे. 

घाटंग्री गावाच्या परिसरात  शनिवारी पहाटे एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने उस्मानाबाद तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याची चर्चा पसरली आहे. 

From around the web