पाच हजार लाच घेताना परंड्यातील आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात 

 
पाच हजार लाच घेताना परंड्यातील आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात

परंडा - टू व्हीलर व फोर व्हीलर वाहनांची ड्रायविंग टेस्टची ऑनलाईन तारीख घेऊन परमनंट लायसन मिळवून देण्यासाठी पाच हजार लाच घेताना एका आर. टी. ओ.  एजंटास  उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. 

तक्रारदार व त्यांचे दोन मित्र असे तिघांचे टू व्हीलर व फोर व्हीलरचे लर्निंग लायसन्स साठी प्रत्येकी एक हजार रुपये यापूर्वी खाजगी आर. टी. ओ. एजेंट  यांनी स्वतः स्विकारल्याचे मान्य करून तक्रारदार आणि त्याच्या एका मित्राचे टू व्हीलर व फोर व्हीलर वाहनांची ड्रायविंग टेस्टची ऑनलाईन तारीख घेऊन परमनंट लायसन मिळवून देण्यासाठी  आर. टी. ओ एजेंट  ओंकार नागनाथ थोरबोले, वय  22 वर्ष, रा. मंगळवार पेठ, परांडा यांनी तक्रारदार यांचेकडे 5000 रुपये लाचेची मागणी करून  5000 रुपये लाच रक्कम पंचा समक्ष  स्वीकारली. याबाबत  पो स्टे परंडा , ज़िल्हा उस्मानाबाद येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.श्री.राहुल खाडे , अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद   प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वी उस्मानाबादयांचे  मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार  मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके , अविनाश आचार्य, चालक इरफान पठाण यांनी मदत केली.

कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००)  गौरीशंकर पाबळे, पो. नि, ला. प्र. वी. उस्मानाबाद ( मो. क्र. 8888813720) यांनी केले आहे.

From around the web