तुळजापूर-औसा महामार्गाकरीता 61.8 कोटी रुपये मंजूर

काक्रंबा उड्डाण पुलाच्या कामासाठी 25 कोटी मंजूर
 
omraje

 खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या  पाठपुराव्यास यश

 

 धाराशिव -   धाराशिव जिल्हयातून जाणाऱ्या महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गापैकी तुळजापूर-औसा राष्ट्रीय महामार्ग क्र.361 हा राष्ट्रीय महामार्ग जिल्हयासाठीच नव्हे तर मराठवाडा व विदर्भ यांच्याशी थेट संपर्क निर्माण करणारा महामार्ग आहे. या महामार्गावरील तुळजापूर-औसा तालुक्यात अनेक ठिकाणी अपुर्ण  कामे  2019 या वर्षापासून प्रलंबित आहेत सदर महामार्गावर या अपूर्ण कामा मुळे अपघाताचे प्रमाण वाढूण मोठया प्रमाणात जीवित व वित्त हाणी होत असल्या कारणाने नागरिकांन कडून वारंवार तक्रारी  खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडे प्राप्त होत होत्या. 

त्यानंतर खासदार राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या निर्दशनास आणून दिले तरीही प्रशासकिय विलंबा मुळे सदर कामास योग्य ती गती प्राप्त होत नव्हती दि. 26/06/2020 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारीसाहेब तसेच राष्ट्रीय प्राधिकरण चे प्रकल्प संचालक व इतर अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन त्याच दिवशी तत्काळ पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. तद नंतर 05/10/2021 रोजी पुनश्च : पाहणी दौरा करण्यात आला व सदर राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबत प्रकल्प संचालक यांना निर्देशित करण्यात आले. दि. 24/07/2020 रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांन समवेत आढावा बैठक घेऊन सदर  तुळजापूर तालुक्यातील सर्वअपूर्ण कामांचे अंदाजपत्रक बनवून  मान्यतेसाठी पाठवून देण्याबाबत सूचना करण्यात आल्या.

             प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग यांनी सदर तुळजापूर तालुक्यातील सर्व अपूर्ण कामाचे अंदाजपत्रक विभागीय कार्यालया मार्फत अंतिम मंजूरी करिता मा.ना.श्री. नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे पाठवूनदिले या कामाच्या अनुषंगाने . खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर  यांनी दि.04/08/2022 रोजी  दिल्ली येथे भेट घेऊन सदर महामार्गावरील उपरोक्त तालुक्यतील सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबत आग्रह व विनंती केली.सदर प्रलंबित कामांस 61.8 कोटी रुपये मंजूर केल्याचे .खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना पत्रान्वये दि.24/07/2023 रोजी कळविले आहे. 

.या कामामध्ये प्रामुख्याने तुळजापूर बाहय वळण रस्त्यावरील काक्रंबा गावातील उड्डान पुलाकरीता 25 कोटी रुपये तसेच तुळजापूर येथील  सर्व्हिस रोड,  ताकविकी येथे सर्व्हिस रोड व   सिमेंट नाली बांधकाम, हिंन्दुस्थान एज्युकेश सोसायटी,औसा येथे पादचारी पुल  (फुट ओव्हर ब्रीज) (मायनर जंक्शन) छोटया स्थानवरील दुरुस्ती करिता  36.8 कोटी  रक्कमया सर्व कामांन करिता मंजूर झाले.

             तुळजापूर-औसा महामार्गा क्र.361 वरील अपूर्ण कामे पूर्ण करणेबाबत एकूण 61.08 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने या महामार्गावरील दळणवळण व्यवस्था सुरळीत होऊन अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शना करिता येणाऱ्या भाविक भक्तांची काक्रंबा गावातील उड्डाण पुलामुळे सोय होऊन वाहतुकीची  कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे प्रलंबित कामे पूर्ण होणार असल्याने नागरिकांन कडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.  

From around the web