उस्मानाबाद जिल्हयातील सरपंच पदाचे आरक्षण व संख्या निश्चित

 -जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
 
उस्मानाबाद जिल्हयातील सरपंच पदाचे आरक्षण व संख्या निश्चित

 उस्मानाबाद - ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तालुकानिहाय जिल्हयातील सरंपच व उपसरपंचाची पदे वेगवेगळया प्रवर्गासाठी व महिलांसाठी आरक्षित करून संख्या निश्चित करण्यात आलेली आहेत.

प्रत्येक तालुक्यातील अनुसूचित जाती,जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाच्या व्यक्तींसाठी त्या त्या जाती,जमाती व प्रवर्गीय महिलांसाठी ग्रामपंचायतीची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार निश्चित केली आहे.

उस्मानाबाद जिल्हयात ग्रामपंचायतीची  एकुण 622 पदातील अनुसूचित जातीसाठी 101 ग्रामपंचायती निश्चित करण्यात आली असून त्यातील 53 पदे महिलांसाठी असणार आहेत.अनुसूचित जमातीसाठी 14 पैकी महिलासाठी 9 पदे तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकुण 168 पदापैकी 86 पदे महिलांसाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी 339 पैकी 172 पदे महिलांसाठी आरक्षित असणार आहेत.असे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

From around the web