बायोमॅट्रीक मशीनवर ग्राहकांचे अंगठे लावण्याची अट रद्द करा 

पाडोळीच्या मयत रेशन दुकानदारांच्या मुलाची मागणी  
 
बायोमॅट्रीक मशीनवर ग्राहकांचे अंगठे लावण्याची अट रद्द करा

पाडोळी -  उस्मानाबादसह  राज्यात  जिल्ह्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अश्या बिकट परिस्थितीत  रेशन दुकानदारांना बायोमॅट्रीक मशीनवर ग्राहकांचे अंगठे लावून धान्य वाटप करावे लागत आहे, ही अट रद्द करावी, अशी मागणी पाडोळीच्या एका मयत रेशन दुकानदारांच्या मुलाने केली आहे. 


उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी (आ) येथील स्वस्त धान्य दुकान नंबर १ चे रेशन दुकानदार मालक  मोहन गोरोबा गुंड (वय ७२) यांना कोरोनाची लक्षण जाणवू लागल्यामुळे २० एप्रिलला उस्मानाबाद येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.त्यांची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह  आली होती.मात्र उपचारादरम्यान त्यांची (दि. २४) प्राणज्योत मावळली. 

पाडोळी(आ) ह्या गावात बऱ्यापैकी कोरोनाने फैलाव केलेला आहे आणि त्यातच रेशन वाटप करणे हे अत्यावश्यक सेवे मध्ये येत असल्याने रेशन वाटप करणे भाग होते. रेशन वाटपा दरम्यानच वडिलांना संसर्ग झाला आहे. तरी सुद्धा सरकार रेशन वाटपाच्या बायोमॅट्रीक मशीनवर अंगठे लावणे बंद करत नाही. आता तरी सरकारने रेशन दुकानदारांना कोरोना पासून बचाव होणे साठी अद्यावत सुविधा द्याव्यात ,अशी मागणी कोरोनाने मयत मोहन गुंड यांचा मुलगा दत्ता गुंड यांनी केली आहे. 

राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, सर्व रेशन दुकानदाराचा विमा उतरावा, बायोमॅट्रीक मशीनला अंगठे लावणे बंद करण्यात यावे, पीपीई किट द्यावी,सॅनिटायझर उपलब्ध करून घ्यावेत.किमान या तरी मागण्या उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी पूर्ण कराव्यात आणि भविष्यात रेशन दुकानदारांची होणारी हानी, कोरोनाचा संसर्ग रोखावा अशी मागणी मयत  रेशन दुकानदाराच्या  मुलगा दत्ता गुंड यांनी केली आहे.

From around the web