रेमडेसीवीर इजेक्शन : काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती

 
रेमडेसीवीर इजेक्शन : काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती

उस्मानाबाद -   कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसीवीर इजेक्शनच्या खरेदी विक्री तसेच त्याचा पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच त्याचा काळाबाजार साठेबाजी रोखण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी परवा दिले होते.त्यानंतर राज्यशासनानेही याबाबत सूचना दिल्या होत्या.जिल्हयातील या इजेक्शनच्या पुरवठयावर नियंत्रण राखण्यासाठी उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेद्रकुमार कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी या समितीच्या नियुक्तीचे आदेश आज जारी केले आहेत.

जिल्हयातील रुग्णांलयामधून  रेमडेसीवीर इजेक्शनच्या वापराबाबत मार्गदर्शक सूचना आणि  दिशा निर्देश देणारे आदेश तीन दिवासापूर्वीच जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.तथापि, जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या  इजेक्शनची मागणी वाढत आहे.त्यातून जिल्हयात या  इजेक्शनचा काळाबाजार, साठेबाजी होऊन खरेदी विक्री बाबत रुग्णांची आडवणूक होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने हे आदेश जारी केले आहेत .त्यामुळे ही समिती या इजेक्शनचा जिल्हयात पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच पुरवठादार तसेच वितरक यांच्यावर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याचे काम करेल.

या समितीत सदस्य म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनजराज पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हणमंत वडगावे,उप पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, उस्मानाबाद आयएमएचे अध्यक्ष सचिन देशमुख, अन्न व औषध प्रशासनाचे उपआयुक्त (अन्न) श्री.कोडगीरे आणि अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषध ) दीपक सिंद हे सचिव म्हणून काम पाहतील.ही समिती जिल्हयातील रेमडेसीवीर इजेक्शनच्या विक्रेत्यांकडे अचानक भेटी देऊन खरेदी –विक्रीबाबत चौकशी करून काळाबाजार करून या इजेक्शनची विक्री करण्यावर लागु असलेल्या कायदयानुसार कारवाई करेल.या शिवाय अन्न व औषध प्रशासन,पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे  रेमडेसीवीर इजेक्शनच्या काळाबाजारबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन ही समिती संबंधितांवर कारवाई करेल.तसेच या इजेक्शनची आवाजवी किंमतीत विक्री होणार नाही आणि साठेबाजीही होणार नाही,याकडे सातत्याने लक्ष देईल.जिल्हयासाठी रेमडेसीवीर इजेक्शनच्या एकूण साठयापैकी 10 टक्के साठा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्त (औषधी)   यांच्याकडे आपत्तकालीन साठा (contingency stock) म्हणून राखून ठेवण्यात येणार आहे . जिल्हयात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन पुरवठादार कंपनीकडे या इजेक्शनची मागणी नोंदविण्यात यावी.जिल्हयातील खाजगी रुग्णांलयात या इजेक्शनचा वापर योग्य पध्दतीने होतो आहे किंवा नाही यांची रॅडम (Randorm) पध्दतीने खातरजमा करावी.या इजेक्शनची गरज भासल्यास अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या राज्यस्तरीय कट्रोल रुमशी संपर्क साधून योग्य ती कारवाई करावी.या इजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्याच्या सर्व बाबींच्या अनुषंगाने उस्मानाबाद येथील अन्न व औषध प्रशासनाच्या  कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार करण्यात यावा.

जिल्हयात रेमडेसीवीर इजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून होणारा पुरवठा आणि वाटप यावरही समिती नियंत्रण ठेवण्यासाठी तपासणी करून पुरवठादारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करेल.तसेच या इजेक्शनची कमरता भासणार नाही यांची दक्षता घेईल, रेमडेसीवीर इजेक्शनचा पुरवठा पुरवठादारांव्दारे कोरोना रुग्णांलयांना प्रथम करण्यात यावा याबाबतही समिती समन्वयाचे काम करेल.रेमडेसीवीर इजेक्शन वितरक,कोरोना रुग्णांलया सलग्न फार्मसी,मेडिकल स्टोअर औषधी दुकानदार आणि कंपनीचे सी ॲन्ड एफ एजंट यांना या आदेशाव्दारे पुढील प्रमाणे सुचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हयातील सर्व संबंधित रुग्णांलयांनी आणि औषधी पुरवठादार तसेच रुग्णालय सलग्न विक्रेत्यांनी रेमडेसीवीर इजेक्शनची विक्री –वापर  भारत सरकारच्या औषध नियंत्रकांच्या निर्देशानुसार करावा.औषधी दुकानदारांनी सरकारी किंवा खाजगी रुग्णालयाची लेखी मागणी (Prescriptim)  असल्याशिवाय इजेक्शनची विक्री करू नये.हे इजेक्शन विकत घेतलेल्या व्यक्तीचे नाव,रुग्णांचे नाव , कोरोना रुग्णालयाचे नाव,आधार क्रमांक , मोबाईल क्रमांक , बील क्रमांक,एकूण विक्री यांची दररोज नोंद ठेवून ही माहिती सहायक आयुक्त औषध प्रशासन यांना सादर करावी.औषध दुकानदारांनी त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली रेमडेसीवीरची संख्या  दैनंदिन स्वरूपात सहायक आयुक्त प्रशासन यांना सादर करावी.

रेमडेसीवीर इजेक्शनचे वितरण करणाऱ्या सी ॲन्ड एफ एजंटांनी जिल्हयातील औषधी दुकानदारांना ,कोरोना रुग्णांलयांना या इजेक्शनच्या दैनंदिन करण्यात आलेल्या

 पुरवठयाची माहिती.यात कोरोना रुग्णांलयाचे नाव,सलग्न मेडिकलचे नाव,बील क्रमांक,दिनांक,एकूण विक्री संख्या आदी सहायक आयुक्त औषध प्रशासन यांच्याकडे नियमितपणे द्यावी .जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश --  2020/आ.व्य/सीआर-26दि.6 एप्रिल 2021 मधील सूचनांचे तसेच शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपण पालन करावे.

सर्व कोरोना रुग्णालयाचे (Dch-Dchc) यांना आदेश 

          जिल्हाधिकारी कार्यालयाच्या --  2020./आ. व्य/सीआर 26 दि.6 एप्रिल 2021 रोजी दिलेल्या सूचनांचे तसेच शासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे . खाजगी रुग्णांलयांनी कोरोना रुग्णांलये सुरू करण्यापूर्वी त्यांच्या हद्यीतील सक्षम अधिकाऱ्यांकडे कोरोना रुग्णांलय म्हणून नोंद करणे आवश्यक आहे.त्याबाबतची माहिती उस्मानाबाद जिल्हयांच्या –डॅश बोर्डेवर दररोज भरणे आवश्यक आणि बंधनकारक आहे. रेमडेसीवीर इजेक्शनची मागणी करताना कोरोना रुग्णांलयांने यांच्या  रुग्णांलय शासन मान्यता प्राप्त असल्याचे प्रमाणपत्र ,  त्यांच्याशी सलग्न असलेल्या मेडिकल स्टोअरचे परवाने यांच्यासह घाऊक औषधी विक्रेत्याकडे किंवा सी ॲन्ड एफ एजंट यांच्याकडे मागणी नोंदवावी. या इजेक्शनची मागणी करताना रुग्णांलयातील रुग्णं संख्या विचारात घेऊन आणि खरोखरच आवश्यकता आहे का ? यांचा विचार करूनच तीन दिवस पुरेल एवढयाच इजेक्शनच्या साठयांची मागणी करावी.यासाठी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या क्लिनिकल  मॅनेजमेट प्रोटोकॉल विचारात घेण्यात यावा.रुग्णांलयानी स्वत:च कोरोना रुग्णांना औषधी उपलब्ध करून द्यावीत. रुग्णाच्या नातेवाईकांना औषधी घेऊन येण्यास सांगू नये. कोरोना रुग्णांलयानी रुग्णांना औषधांची किंमत शासनमान्य दरानेच आकारावी.काही कारणाने रेमडेसीवीर इजेक्शनचा पूर्ण डोस देण्यात आला नाहीतर त्यांचा उर्वरित साठा रुग्णांलयात किंवा मेडिकल स्टोअर मध्ये परत करावा  आणि त्याचे अभिलेख जपून ठेवावेत . कोरोना रुग्णालयामध्ये कोणताही गैर प्रकार होणार नाही यांची दक्षता घ्यावी.रुग्णालयात गैर प्रकार आढळून आल्यास  रुग्णांलय व्यवस्थापनास जबाबदार धरण्यात येईल असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

From around the web