श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा

 
d

तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव सुरु आहे. आज (सोमवार) पाचव्या माळेच्या दिवशी  श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा बांधण्यात आली आहे. 

भगवान विष्णू शेषशेयैवरती विश्राम करत असताना मातेने त्यांच्या नेत्रकमळात विश्राम घेतला, यावेळी भगवान विष्णू यांच्या मलापासून निर्माण झालेल्या दोन दैत्यांनी साधू, तपस्वी  यांचा छळ सुरू केला, त्यांना ब्रम्हदेवाचा आशीर्वाद होता, या दैत्यांचा वध करण्यासाठी पार्वतीने महिषासुर मर्दिनी अवतार धारण करून त्या दैत्यांचा वध केला,  तेव्हा श्री भगवान विष्णू प्रसन्न होवून आपली शैया देवीस अर्पण केली, त्यामुळे शेषशाही अलंकार पूजा बांधण्यात येते.

रविवारी रात्री छबिना 

रविवारी चौथी  माळ होती. या दिवशी रात्री वाजतगाजत श्री तुळजाभवानी मातेचा वाजत गाजत छबिना काढण्यात आला होता. यावेळी सर्वत्र आई राजा उदो, उदो असा जयघोष सुरु होता. 

From around the web