उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता 

किराणासह अत्यावश्यक सेवा ११ पर्यंत सुरू राहणार 
 
s

उस्मानाबाद - कोरोना संकटाच्या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यात आली आहे.  त्यानुसार जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा स. ७ ते ११  पर्यंत सुरू राहणार आहेत . जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दि. २१ मे रोजी या संदर्भात आदेश जारी केले आहेत.
 
जिल्ह्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक  द चैन मोहिमेंतर्गत  लॉक डाऊन आदेश जारी करण्यात आले  आहेत. लॉकडाऊनमुळे कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे लोक डाऊनचा कालावधी १ जून रोजी स . ७ पर्यंत वाढविण्यात आला आहे . यात  नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून  लॉकडाऊन आदेशात काही अंशी शिथिलता देण्यात आली आहे. 

दवाखाने, वैद्यकीय विमा कार्यालय, लसीकरण केंद्र, औषध दुकाने, चष्मा दुकाने, वैद्यकीय उत्पादन, वितरण सेवा, विमान, रेल्वे, टॅक्सी, सार्वजनिक बस सेवा, ऑटो रिक्षा, मालवाहतूक, पाणीपुरवठा सेवा, खाजगी वाहने (केवळ अत्यावश्यक सेवेसाठी) एटीएम, वीज ,गॅससेवा  या पूर्वीच्या आदेशानुसार  सुरू राहणार आहे. सर्व किराणा दुकाने, भाजी, फळ, दूध विक्री केंद्र, बेकरी, मिठाई केंद्र ,पेट्रोल पंप, पशुखाद्य दुकाने स. ७ ते ११ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच रेस्टॉरंट, बार, हॉटेलसाठी फक्त घरपोच सेवेला परवानगी असेल . राष्ट्रीयकृत, खाजगी, सहकारी, बँकिंग सेवा, डाक सेवा दु.२ पर्यंत सुरू राहील. तर कृषी अवजारे, बियाणे, खत विक्रीस दु.२ पर्यंत परवानगी राहील.

From around the web